राज्य सरकार पुन्हा एकदा तोंडावर सणसणीत आपटले - अतुल भातखळकर

थोबाड फुटले... आमच्याकडे बहुमत आहे या गुर्मीत भाजपच्या १२ आमदारांचे १ वर्षासाठी केलेले निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले.
Atul-Bhatkhalkar
Atul-Bhatkhalkarsakal media
Updated on

मुंबई : थोबाड फुटले... आमच्याकडे बहुमत आहे या गुर्मीत भाजपच्या १२ आमदारांचे १ वर्षासाठी केलेले निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. राज्य सरकार पुन्हा एकदा तोंडावर सणसणीत आपटले, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दिली आहे. ते म्हणतात, हा निर्णय महाभकास आघाडी सरकारचा थोबाड फोडणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी (ता.२८) भाजपचे (BJP) १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात १२ आमदारांनी गैरवर्तन केल्याबद्दल तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी वर्षभरासाठी निलंबन केले होते. त्या निलंबनाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल केले होते.(Atul Bhatkhalkar Welcome Supreme Court Judgment On 12 BJP MLAs Suspension)

Atul-Bhatkhalkar
विमानासाठी पैसा आहे,मात्र विद्यार्थ्यांसाठी नाही; कन्हैय्या कुमारची मोदींवर टीका

त्याचा निर्णय आज न्यायालयाने दिला आहे. भातखळकर म्हणाले, केवळ आम्ही सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून बेकायदेशीर पद्धतीने निलंबित करण्यात आले. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मोडून काढला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे, मतदारसंघातील जनतेचे आभार मानतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com