औरंगाबाद, उस्मानाबाद अन् नवी मुंबई विमानतळ नामांतराचा ठराव मंजूर

नामंतराचा ठराव झाला मंजूर
Aurangabad Osmanabad name change Google
Aurangabad Osmanabad name change Googleesakal

आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यातच आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई यांच्या नामांतराचा ठराव मंजूर झाला आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धारशिव तर मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील या नावांना मंजूरी मिळाली आहे.

विधानसभेत तीन प्रस्ताव मंजूर त्यामध्ये औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी नगर करण्यात आलं आहे. त्याचबरोबर उस्मानाबादचे नाव धारशिव करण्यात आलं आहे. तर नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि. बा. पाटील असं नामकरण करण्याचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामंतरावर आक्षेप घेण्यात आला होता, नामांतराला विरोध करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आल्या होत्या.

मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नमूद केल्याप्रमाणे या अगोदर 1998 साली उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धारशिव करण्यात आले होते. हा निर्णय शासनाने 2001 साली रद्द केला. त्यामुळे राज्य शासनाने घेतलेला नामांतराचा निर्णय हा फक्त राजकीय हेतूने घेतलेला निर्णय असल्याचा दावा याचिकाकर्ते यांनी केला होता. तसेच हा निर्णय केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाच्या विरोधात आहे. फक्त राज्यामध्ये सत्तांतर झाले म्हणून असे नामांतरचे निर्णय घेता येणार नाही. नामांतराचा निर्णय हा संविधानाच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात आहे असेही याचिकेत नमुद करण्यात आले होते. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. तसेच त्यास अंतरिम स्थगिती द्यावी अशीही मागणी केली गेली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com