Aurangabad History : फतेहनगर ते छत्रपती संभाजीनगर कितीवेळा बदललं औरंगाबादचं नाव, जाणून घ्या l Aurangabad renamed History Aurangajeb Death Anniversary | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad History

Aurangabad History : फतेहनगर ते छत्रपती संभाजीनगर कितीवेळा बदललं औरंगाबादचं नाव, जाणून घ्या

Aurangajeb Death Anniversary : औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात आलं आहे. यासोबतच उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या या प्रस्तावावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केल्यावर ते शक्य झालं आहे.

औरंगाबादचं नाव बदलण्याचा मागणी १९८८पासून करण्यात येत होती. महाराष्ट्रातल्या या शहराला मुघल सम्राट औरंगजेबच नाव नको असा विरोध शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं अशी मागणी त्यांनीच केली होती. पण तुम्हाला माहिती आहे का की, औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललं आहे?

औरंगाबादचा इतिहास

औरंगाबाद शहर ज्या परिसरात आहे त्या परिसराचा संबंध सातवाहन काळाशी आहे. राजा विक्रमादित्याच्या काळातही या जागेचा उल्लेख आहे. सातवाहन कालखंडात खाम नदीच्या किनाऱ्यावर अनेक लहान मोठे गाव होते. त्यापैकी एका गावाला आज औरंगाबाद म्हणून ओलखलं जातं.

१४व्या शतकापर्यंत या ठिकाणी देवगिरीच्या हिंदू साम्राज्याचे सम्राट कृष्णदेवराय यांचे वंशज यादवांचं राज्य होतं. तर काही जणांचं म्हणनं आहे की, १६०४ मध्ये अहमदनगरचे निजामशाह मुर्तजा द्वितीयचे मंत्री मलिक अंबरने औरंगाबाद शहर वसवलं आहे. पण हे शहर आधीच अस्तित्वात होतं, मलिक अंबरने याचं फक्त नामकरण फतेहनगर असं केलं होतं.

आजवर बदलले गेलेली नावं

  • १६२६ - मलिक अंबरचा मुलगा फतेह खानने फतेहनगर नाव दिलं.

  • १६३६ - बादशाह शाहजहाने औरंगजेबला इथं पाठवलं, त्याने या जागेला खुजिस्ता बुनियाद असं नाव दिलं.

  • १६५७ - औरंगजेबने परत नाव बदलून औरंगाबाद केलं.

  • १९८८ - औरंगजेबच्या नावाचा विरोद करून बाळासाहेब ठाकरेंनी याचं नाव संभाजीनगर केलं.

  • १९९५ - शिवसेना भाजप सरकारने दोन्ही शहरांचं नाव अधिकृत रित्या बदलण्याचा निर्णय घेतला पण प्रकरण कोर्टात गेलं.

  • १९९९ - काँग्रेसने कोर्टाला सांगितलं की, नाव बदलण्याचा प्रस्ताव ते मागे घेत आहेत.

  • २९ जून २०२२ - उद्धव ठाकरे सरकारने संभाजीनगर नावाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली.

  • १६ जुलै २०२२ - छत्रपती संभाजीनगर नावावर शिंदे सरकारने मंजूरी दिली.

  • २४ फेब्रुवारी २०२३ - केंद्र सरकारने छत्रपती संभाजीनगर नावावर मंजुरी दिली आहे.