राष्ट्रवादीचे नेते तटकरे यांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 September 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे व श्रीवर्धनचे विद्यमान आमदार अवधूत तटकरे यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला अवधूत तटकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर ते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवसेना भवनला रवाना झाले आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे व श्रीवर्धनचे विद्यमान आमदार अवधूत तटकरे यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला अवधूत तटकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर ते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवसेना भवनला रवाना झाले आहेत.

काही दिवासांपूर्वी त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांनंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. आज (ता.05) आमदारकीचा राजीनामा दिला.

महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदारांचे पक्षांतर सुरू असून आता त्यात राष्ट्रवादीचा गड मानला जाणाऱ्या रायगड जिल्ह्याचाही क्रमांक लागला आहे असे आता म्हणावे लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: awdhoot Tatkare resign as MLA