Jitendra Awhad : "रामदेव बाबांना आई आहे… आणि ते ब्रम्हचारी…"; आव्हाडांनी करून दिली मराठी साहित्याची आठवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

baba ramdev controversy NCP jitendra awhad tweet on ramdev baba controversial statement on women cloths

Jitendra Awhad : "रामदेव बाबांना आई आहे… आणि ते ब्रम्हचारी…"; आव्हाडांनी करून दिली मराठी साहित्याची आठवण

मुंबई : रामदेव बाबा त्यांच्या एका विधानामुळे सध्या अडचणीत सापडले आहेत. महिलांच्या कपड्यांबद्दल बोलताना महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातल तरी चांगल्या दिसतात असं वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे. या वक्तव्याचे तीव्र पडसाद पाहायला मिळत आहत, राजकीय क्षेत्रातून देखील या विधानावर प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी देखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

आव्हाडांनी रामदेव बाबा यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे, मराठी साहित्यात परस्त्रीला मातेचा दर्जा दिला जातो याची देखील आठवण त्यांनी करून दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "रामदेव बाबांना आई आहे … आणि ते ब्रम्हचारी... मग … मनात डोळ्यात विकृती…मराठी साहित्यात परस्त्री माते समान…"

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Santosh Bangar Hingoli Video : अरे पवार आमदार बांगर बोलतोय... सोशल मिडीयावर राडा

रामदेवबाबा काय म्हणाले..

रामदेवबाबा यांनी ठाण्यातील एका योग कार्यक्रमामध्ये बोलताना हे विधान केलं आहे. साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे या सर्वांच्या उपस्थित केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाचा वाद अधिक चिघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा: NCP : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह? माजी खासदाराने तडकाफडकी सोडला पक्ष