बबनराव लोणीकर प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, कोणी काय बोलावं...

कुठल्याही नागरिकांनी अधिकाऱ्याबाबत वेगळ्या भाषेत बोलू नये-बबनराव लोणीकर
ajit pawar
ajit pawar Esakal

गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रकरणामुळे भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये टीका-टीप्पणी सुरुचं आहे. रोज कोणत्या ना कोणत्या विषयावरून एकमेंकावर ताशेरे ओढण्याची एकही संधी सत्ताधारी आणि विरोधक सोडत नाहीत. दरम्यान, बबनराव लोणीकर यांचे वीज कर्मचाऱ्याला (Mahavitaran) धमकावल्याचा आणि अपशब्द वापरल्याचा ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बबनराव लोणीकर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. शासकीय कामात अडथळा आणला तर त्याबद्दल तक्रार करता येते आणि पुढील कारवाई करता येते. पण नियमाच्या अधिन राहून काम केले पाहिजे. नियम तोडून काम करू नये असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

Summary

कुठल्याही नागरिकांनी अधिकाऱ्याबाबत वेगळ्या भाषेत बोलू नये. कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार

ajit pawar
रिल्सचं व्यसन तरूणाला भोवलं; सापांसोबत स्टंट...पोलिसांकडून समाचार

काय म्हणाले अजित पवार

'मी काय बघायचे, कुणी काय बोलावे, कोण काय बोलत आहे याचा संपूर्ण अनुभव लोक घेत आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. त्यापेक्षा मी माझ्या विभागाच्या कामाबद्दल बोलत राहिन. जर कोणताही अधिकारी नियमाला धरून काम करत असेल व त्याच्याबद्दल टीका टिप्पणी होत असेल तर त्याबद्दल कायदे आहेत. शासकीय कामात अडथळा आणला तर त्याबद्दल तक्रार करता येते आणि पुढील कारवाई करता येते. पण नियमाच्या अधीन राहून काम केले पाहिजे. नियम तोडून काम करू नये', असे म्हणत अजित पवारांनी बबनराव लोणीकर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.

बबनराव लोणीकर यांची ऑडिओ क्लीप व्हायरल

औरंगाबादमधील सातारा भागातील बबनराव लोणीकर यांच्या घराचं तीन लाख रुपयाचं वीजबिल थकल्यानं महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं वीज मीटर काढून नेलं. यामुळं संतप्त झालेल्या लोणीकरांनी थेट महावितरणचे अभियंते दादासाहेब काळे यांना फोन लावला आणि जाब विचारायला सुरुवात केली. ते म्हणाले, "नालायकांनो आम्ही बील भरतो. दोन मीटरचे मी दहा लाख रुपये बील भरलं आहे. तुमच्यामध्ये दम आहे का? हिंमत आहे का? झोपडपट्टीत जा, जे लोक आकडे टाकतात त्यांच्याकडे जा. एका मिनिटांत तुला मी घरी पाठवीन. तुला माज चढलाय का? नोटीस न देता आमचं मीटर तुम्ही कसं काय काढून नेलं?" असे संभाषण व्हायरल झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com