'असा माणूस शतकांमधून एकदाच होतो'; मृणाल कुलकर्णी भावूक | Babasaheb Purandare | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Babasaheb Purandare, Mrunal Kulkarni

'असा माणूस शतकांमधून एकदाच होतो'; मृणाल कुलकर्णी भावूक

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं Babasaheb Purandare आज (१५ नोव्हेंबर) पुण्यात निधन झालं. पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने दिली. सर्वच स्तरांमधून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अनेक ऐतिहासिक भूमिका साकारलेल्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे बाबासाहेबांशी कौटुंबिक संबंध होते. मृणाल कुलकर्णी Mrunal Kulkarni यांनी बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

"त्यांच्या निधनामुळे आमच्या कुटुंबाची वैयक्तिक हानी झाली. शिवाय आपलं सामाजिक नुकसानही झालंय. असा माणूस हा शतकांमधून एकदाच होतो आणि ती व्यक्ती आपल्यासोबत होती. त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत होते. हे खूप मोठं भाग्य होतं असं मला नेहमी वाटायचं. माझ्या बालपणापासून, अगदी पहिल्या पावलापासून त्यांचा हात माझ्या डोक्यावर होता. या दु:खात आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत", असं त्या म्हणाल्या.

"बाबासाहेब म्हणजे चालता बोलता इतिहास होते. त्यांच्यावर देवाची कृपादृष्टी होती. असा माणूस पुन्हा होणे नाही. त्यांच्या स्मृती सतत आपल्यासोबत राहतील", अशा शब्दांत त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली वाहिली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर गेल्या आठवड्यापासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपाचारावेळीच त्यांची प्राणज्योत मालवली. बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव पर्वती येथील निवासस्थानी आणले असून नागरिकांची अंत्यदर्शनासाठी गर्दी होत आहे. पर्वती पायथा निवासस्थानी 8 ते 12 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

loading image
go to top