Bacchu Kadu: "मला मुख्यमंत्री बनवलं तर..."; बच्चू कडू कडाडले, बागेश्वर बाबावरून फडणविसांना दिले टोले

Bacchu Kadu
Bacchu Kadu
Updated on

Bacchu Kadu: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात बागेश्वर महाराज यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सनातन धर्माबाबत वक्तव्य केले. दरम्यान आमदार बच्चू कडू यांना देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.  देवेंद्र फडणीस यांना बागेश्वर महाराज महत्वाचे वाटत असतील. त्यामुळे ते पुण्याला गेले. तुकाराम महाराज वैचारिक संत होते. तर बागेश्वर महाराज चमत्कारी संत आहेत, असे बच्चू कडू म्हणाले.

साईबाबा आणि तुकाराम महाराज यांना बागेश्वरबाबा बोलत होते. मात्र ते आता तुकाराम महाराजांचे दर्शन घेत आहेत. त्यामुळे सर्व संपलं. प्रत्येकाच्या भावना असताना कुणी चमत्काराला मानतं कुणी नाही मानत, असे बच्चू कडू म्हणाले. (Latest Marathi News)

बच्चू कडू म्हणाले, "महाराष्ट्र सध्या वेगळ्या वळणावर जात आहे. साई बाबांच्या नगरीत त्यांचाच अपमान करणाऱ्या बागेश्वरबाबा प्रती फडणवीसांची आस्था अधिक असू शकते. त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे."

Bacchu Kadu
Loksabha Election 2024: "जिथं मित्रपक्ष लढतील तिथं...";  लोकसभा निवडणुकीसाठी फडणवीसांनी सांगितला भाजपचा मास्टर प्लॅन

मला मुख्यमंत्री केलं तर...

आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, अशी भूमिका मनसे मांडणार आहे. यावर बच्चू कडू म्हणाले, मनसेला कुणी प्रतिसाद देणार नाही. राज ठाकरे यांना माहित आहे. धर्माच्या, जातीच्या नावावर पेटवण्याची गरज नाही, असे बच्चू कडू म्हणाले.

राज ठाकरे म्हणतात आर्थिक आरक्षण द्यावं. तर आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना, मजूरांना आर्थिक निकषावर आरक्षण द्या. आमच्या हाती कारभार दिला तर हे सर्व प्रश्न जास्तीत जास्त सहा महिन्यात सोडवले जातील. मला मुख्यमंत्री केलं तरी एका महिन्यात शेतकरी सुखी होईल, असा विश्वास आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

Bacchu Kadu
Cyber Scam : 113 रुपयांचा रिफंड मागायला केला कॅब कंपनीला फोन; अन् खात्यातून गायब झाले 5 लाख! काय आहे हा स्कॅम?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com