
Maharashtra Politics : शिंदे-भाजप युतीत राजकीय अस्थिरता; बच्चू कडूंनी दिली कबुली, म्हणाले…
सध्या राज्याच्या राजकारणात सत्ताधारी शिदे-भाजप युती आणि विरोधकांमध्ये राजकीय अस्थिरता असल्याचे विधान बच्चू कडू यांनी केले आहे. रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तारावरून बच्चू कडू हे नाराज असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे.
यादरम्यान सत्ताधारी पक्षांच्या युतीमध्ये देखील अस्थिरता असल्याचे विधान प्रहारचे आमदार कडू यांनी केलं आहे. यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
राज्यात राजकीय अस्थिरता आहे. ती महाविकास आघाडी आणि शिंदे गट अशा दोन्हीकडे आहे. शिंदे गटात कोर्ट केस यामुळे अडचणीचा विषय आहे.काही दिवसांपूर्वी मोठा उठाव झाला आणि शिंदे गट बाजूला झाला त्यामुळे ही अडचण पहिल्यांदाच महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात पाहतोय, असे बच्चू कडू म्हणाले.
धनुष्यबाण कोणाला मिळणार?
धनुष्यबाण, शिवसेना पक्षावर सुरु असलेल्या सुनावणीवर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, धनुष्यबाण शिंदे गटालाच भेटेल. आमदार, नगकसेवक आणि पदाधिकाऱ्यांची संख्या पाहाता शिंदे गटाच्या बाजून जास्त आहे. याआधीचे निर्णय पाहिले तर शिंदे गटाला धनुष्यबाण मिळेल असे कडू म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तार कधी?
आता विस्तार करावा लागेल, कारण एकाच मंत्र्यांकडे बरेच खाते असल्याने त्याचा ताण येतोय, महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष होतेय. सरकारची विस्तार करु नये अशी मानसिकता नाहीये. विस्तार कधी होईल हे निश्चित सांगता येणार नाही.
शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या निर्णयावरच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला आहे असं वाटतं. निर्णय झाला की विस्तार होईल असेही कडू म्हणाले. ते टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.