Bachhu Kadu : जरा सबुरीने घ्या...मंत्री दीपक केसरकरांकडून बच्चू कडूंची मनधरणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bachhu Kadu deepak kesarkars statement maharashtra politics

Bachhu Kadu : जरा सबुरीने घ्या...मंत्री दीपक केसरकरांकडून बच्चू कडूंची मनधरणी

भाजपच्या आडोशाला राहून दलाली आणि स्टंटबाजी करणा-या आमदार रवी राणा यांच्याकडूनच खोक्यांचे आरोप माझ्यावर झाले आहेत. सत्तेवर लाथ मारणारा माझ्या सारख्या स्वाभिमानी माणूस असले आरोप सहन करणार नाही. अशा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. दरम्यान, मंत्री दीपक केसरकर यांनी बच्चू कडू यांच्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे.(Bachhu Kadu deepak kesarkars statement maharashtra politics )

एकिकडे अपक्षांना संधी दिली जाईल असे बोलले जात होते परंतु बंच्चु कडू यांच्यासह कोणत्याही अपक्षाला संधी न मिळाल्याने नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे, राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. यासर्वांमुळे कडू यांनी अप्रत्यक्षपणे सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांच्या नाराजीवर भाष्य केलं. बच्चू कडू यांनी सबुरीने घ्यावे ते लवकरच मंत्रीपदावर असतील असे सूचक वक्तव्य केसरकर यांनी यावेळी केलं.

केसरकर म्हणाले की, बच्चू कडू हे जेष्ठ नेते असून, त्यांच्याबरोबर दोन आमदार आहेत. अन्य आमदारांच्यावतीने ते बोलत असतील तर, मला त्यातील वस्तुस्थिती माहिती नाही. लवकरच ते मंत्रीपदी दिसतील, अशी आमची अपेक्षा आहे. जे व्यक्ती मंत्री होणार आहेत, त्यांनी थोड संयम ठेवायला हवा, असं केसरकर यांनी म्हटलं आहे.