esakal | बाळासाहेबांना अभिवादन करताना फडणवीस म्हणतात, स्वाभिमान जपा
sakal

बोलून बातमी शोधा

Untitled-1.jpg

भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्टिटरवरती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. तसेच त्यांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.  

बाळासाहेबांना अभिवादन करताना फडणवीस म्हणतात, स्वाभिमान जपा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना प्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची आज 7 वी पुण्यतिथी आहे. त्यासाठी, जगभरातून बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात येत आहे. आज सकाळी भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्टिटरवरती त्यांना अभिवादन केले आहे. तसेच त्यांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.  

फडणवीस यांनी व्टिट केलेल्या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला! तसेच त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेब यांच्या भाषणाचा थोडासा आलेख आहे. यामध्ये बाळासाहेब कशा रितीने स्वाभिमान जपा असे सांगतानाचा तो व्हिडीओ आहे.     

दरम्यान, 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब अनंतात विलिन झाले. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपल्या नावाचा अजरामर जागर बाळासाहेबांनी केला. सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना, बेरोजगारांना आमदार, खासदार मंत्री बनवणारा नेता म्हणून बाळासाहेबांची महाराष्ट्राला ओळख आहे. बाळासाहेब ठाकरें यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोशल मीडियावरुनही अनेकजण आपल्या आठवणी शेअर करत आहेत.

सोशल मीडियातूनह मोठ्या प्रमाणात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. तसेच, मुंबईतील शिवाजी पार्क येथील शिवतिर्थावर महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांना आंदरांजली वाहण्यासाठी येत आहे. सन 1966 साली आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेबांचे वडिल प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पक्षाचे शिवसेना असे नामकरण केले. त्यानंतर, शिवसेनेने कधीही मागे वळून पाहिले नाही.

सन 1972 साली वामनराव महाडिक यांनी शिवसेनेच्या तिकिटावर परेळ मतदारसंघातून विजय मिळवला होता. महाडिक हे शिवसेनेचे पहिले आमदार ठरले. त्यानंतर, 1990 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे 52 उमेदवार विजयी झाले. त्यावेळी, भाजपाला 42 जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर 1995 साली शिवसेना 73 तर भाजपा 65 जागांवर विजयी झाली. सन 1999 मध्ये शिवसेनेनं 69 जागांवर विजय मिळवला, तर भाजपाने 56 जागा जिंकून अपक्षांच्या मदतीने सेना-भाजपा युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं. 

शिवसेना ही अल्पावधीतच ग्रामीण भागात रुजली, गावकडच्या युवकांनी बाळासाहेबांना दैवत मानून शिवसेनेसाठी काम केलं. म्हणून गावा-खेड्यात शिवसेना वाढत गेली. बाळासाहेब हाच विचार, शिवसेना हाच विचार मानून शिवसैनिकांनी एकनिष्ठेचं उदाहरण इतर पक्षांपुढे ठेवलं.