शिवसेनेनेच नरेंद्र मोदींना वाचवलं! ठाकरे गटाच्या नेत्याकडून 'त्या' प्रसंगाची आठवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bal Thackeray

शिवसेनेनेच नरेंद्र मोदींना वाचवलं! ठाकरे गटाच्या नेत्याकडून 'त्या' प्रसंगाची आठवण

Mumbai: गुजरात विधानसभा निवडणूक मतदानाच्या पहिल्या टप्प्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. क्रिकेटपटू जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा भाजपकडून गुजरात विधानसभा निवडणूक लढवत आहे.

सध्या रवींद्र जडेजा पत्नीचा प्रचार करण्यात व्यस्त आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी या व्हिडीओचा हवाला देत भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना वाचवलं आहे. नर्मदा आंदोलनाच्या वेळेस नरेंद्र मोदी एकटेच उपोषणाला बसले होते.

हेही वाचा- आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

त्यावेळेस भाजपचं कोणीही गेलं नव्हतं. तेव्हा स्व.बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांनी उद्धव ठाकरे यांना नरेंद्र मोदी उपोषणाला बसले आहेत तुम्ही तिकडे जाऊन या. असं सांगितसं होतं तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणतेही पद नव्हते तरीही उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदींना भेटून आले होते, असे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले.