नागरिकत्व कायद्याविरोधात "बंद' व मोर्चा 

parbhani
parbhani
Updated on

मुंबई - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही राज्यात ठिकठिकाणी आंदोलन झाले. यात मराठवाड्यातील आंदोलनाला हिंसक वळण लागले. बीडमध्ये पुकारलेल्या "बंद'त आंदोलकांनी काही बस फोडल्या व पोलिसांवरही दगडफेक केली. जमाव पांगविण्यासाठी आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

परभणीत मुस्लिम समाजाच्या मोर्चादरम्यान पोलिस अधीक्षक कार्यालयावर झालेल्या दगडफेकीत तहसीलदार विद्याचरण कडवकर जखमी झाल्या. कळमनुरीत (जि. हिंगोली) "बंद'दरम्यान बसवर दगडफेक करण्यात आली. 

मराठवाडा - 
- नागरिकत्व सुधारणा व संशोधन कायद्याच्या विरोधात बीड शहरात बंद पाळला. 
- नमाजानंतर दोन हजार लोकांचा जमाव निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला असताना काहींची बसवर दगडफेक 
- जमावाला पांगविण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या दिशेनेही दगफडफेक करण्यात आली. 
- एका बससह पोलिस व्हॅनचे दगडफेकीत नुकसान. 
- दोन पोलिस कर्मचारीही किरकोळ जखमी. 
- जमाव पांगविण्यासाठी आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. 
- अर्धा तासात परिस्थिती नियंत्रणात 
- नेकनूरला मूक मोर्चा व परळीत उपोषण, गेवराईत बंद पाळण्यात आला. 
- औरंगाबाद शहरात "एमआयएम'चा मोठा मोर्चा. 
- गेवराइर्त मूक मोर्चा 
- जालन्यात "बंद'ला संमिश्र प्रतिसाद. बाजार समितीचे व्यवहार ठप्प 
- नांदेडमध्ये कायदा रद्द करण्याची सर्वपक्षीय धरणे आंदोलनात मागणी 
- परभणीत मुस्लिम समाजाच्या मोर्चादरम्यान पोलिसांवर दगडफेक 
- अग्निशमन दलाच्या वाहनासह अन्य वाहनांची तोडफोड 
- जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील घरांवर दगडफेक. 
- पाथरी, पूर्णा येथेही मोर्चा काढण्यात आला. पालम, बोरी येथे कडकडीत "बंद' 
- हिंगोली जिल्ह्यात कळमनुरीत "बंद'दरम्यान पाच बस, अग्निशमन दलाच एक वाहन आणि ट्रकवर दगडफेक. बस जाळण्याचा प्रयत्न 
- जमाव पांगवताना पोलिसांवरही दगडफेक. अश्रुधुरांच्या 20 नळकांड्या फोडल्या. 
- दगडफेरीत तीन प्रवासी जखमी 
- पोस्ट कार्यालय दरवाजाला आग लावण्याचा प्रयत्न 
- हिंगोलीत मानव विकास मिशनच्या बसवर दगडफेक 
-औंढा नागनाथ तालुक्‍यातील जवळा बाजार, वसमत तालुक्‍यातील हट्टा येथे "रास्ता रोको' 
-कळमनुरी तालुक्‍यातील आखाडा बाळापूर, वारंगा येथे निषेध फेरी 

खानदेश - जळगावात कायद्याविरोधात मुस्लिम मंचतर्फे सर्वधर्मीय मोर्चा 
- जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने, धरणे आंदोलन 
- कायद्याच्या समर्थनार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मू.जे. महाविद्यालयात विनापरवाना ढोलवादन. संबंधित कार्यकर्त्यांविरोधात कारवाईचे सूचोवाच 

पश्‍चिम महाराष्ट्र - 
- पुण्यात मुस्लिम समुदाय आणि संविधान बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 
- कोल्हापूरमध्ये "एमआयएम' पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन 
- कायद्याची अमलबजावणीसाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची वाहनांची फेरी 
- मिरजेत कायद्याविरोधात मोर्चा 
- नगरमध्ये कायद्यास विरोध दर्शविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने 
- जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 
विदर्भ - नागपूरमध्ये मुस्लिम नागरिकांचा विधान भवनावर मोर्चा काढला 
- नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवीत मुस्लिम आरक्षणाची मागणी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com