

सोलापूर : सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीत वास्तव्यास असलेल्या १२ बांगलादेशींना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड सापडली असून ती त्रिपुरा व पश्चिम बंगाल, तमिळनाडू येथील आहेत. त्याचा तपास सुरु असतानाच सोलापुरातून ठाण्याला पळून गेलेला आणखी एक बांगलादेशी एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने जेरबंद केला आहे.
आसाममार्गे अवैधरित्या भारतात घुसखोरी करुन ठाण्यावरुन सोलापुरात आलेल्या १२ बांगलादेशींना दहशतवाद विरोधी पथक व सोलापूर शहर पोलिसांनी जेरबंद केले होते. त्यानंतर बहारुल हसमतअली इस्लाम (वय २५, रा. गुगीबारी, आसाम) या एजंटला देखील एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्याच हद्दीतून जेरबंद केले आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी ठाण्याला पाठविलेल्या पथकाने आणखी एका बांगलादेशीला अटक केली असून अनेसूर मोहम्मद अब्दुल कलाम शेख (वय ३३, रा. बांगलादेश)असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडील आधारकार्ड कर्नाटकातील असून तो सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील जगदंबा रेडीमेड ड्रेसेसशेजारी राहायला होता. त्याच्या १२ साथीदारांना अटक केल्यावर तो ठाणे येथे पसार झाला होता. शहर पोलिसांच्या पथकाने शनिवारी (ता. ८) दिवसभर त्याचा ठाण्यात शोध घेऊन त्याला पकडले. त्याला सोलापुरात आणून पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे तपास करीत आहेत.
भाजप पदाधिकारी व उद्योजकांकडून पोलिसांचा सत्कार
अवैधपणे भारतात घुसखोरी करून सोलापुरात वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी घुसखोरांना पकडल्याबद्दल भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह अक्कलकोट रोड एमआयडीसीतील उद्योजकांकडून एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. भाजपचे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा म्हणाले, शहर पोलिसांच्या कामगिरीमुळे सोलापूरची मान देशभरात उंचावली आहे. याप्रसंगी बजरंग कुलकर्णी, श्रीनिवास दायमा, शहर सचिव नागेश सरगम, प्रभाकर गणपा, उद्योजक श्रीनिवास दुबास, सुनील उडता, अनिल बंसल, कृष्णकांत दायमा, गोपाल दायमा, चिन्नू गाजूल, बालाजी गंजी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.