Fri, June 2, 2023

भाजपच्या साथीनं NCP सहकारमंत्र्यांकडून 'काँग्रेस'चा करेक्ट कार्यक्रम
Published on : 23 November 2021, 3:47 am
कऱ्हाड (सातारा) : राज्याचं लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील प्रतिष्ठेच्या लढतीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विजय मिळवून माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा 8 मतांनी पराभव केला. एका-एका मताची बेरीज करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहकारमंत्र्यांनी भाजपच्या भोसले गटाला जवळ करुन शिष्टाईतून लढवलेल्या या निवडणुकीत परफेक्ट नियोजन करुन उंडाळकरांचा करेक्ट कार्यक्रम केला. या विजयामुळे सहकारमंत्र्यांचा अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच जिल्हा बॅंकेत पुढच्या दाराने प्रवेश नक्की झाला आहे. दरम्यान, हा निकाल कऱ्हाड तालुक्यातील बदलणाऱ्या राजकीय समीकरणांची नांदीच ठरला आहे.