Supriya Sule: राष्ट्रवादीचं ठरलं? महाराष्ट्रची पहिला महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे! banner Infront of ncp office Maharashtra first woman Chief Minister Supriya Sule | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Supriya Sule

Supriya Sule: राष्ट्रवादीचं ठरलं? महाराष्ट्रची पहिला महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे!

गेल्या काही दिवसांपासून भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पोस्टर मुंबईतील राष्ट्रवादी ऑफिसच्या बाहेर लावलेले दिसून आले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं होतं. अशातच आता पुन्हा एकदा पोस्टरची चर्चा रंगली ती म्हणजे महाराष्ट्रची पहिला महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे! अशा आशयाच होर्डिंग्ज लागले आहेत.

NCP

NCP

राष्ट्रवादी कार्यालय बाहेर हे होर्डिंग्ज लागले असून राजकीय वर्तुळात या होर्डिंग्जची चर्चा रंगली आहे. या होर्डिंग्जवर महाराष्ट्रची पहिला महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे! असा उल्लेख आहे.

राष्ट्रवादीकडून होणाऱ्या बॅनरबाजीची सध्या सातत्याने चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वीच जयंत पाटलांच्या बॅनरची चर्चा होती, तर परवा अजित पवारांमुळे चर्चा होत असतानाच आज सुप्रिया सुळे यांचे होर्डिंग्ज लागले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसच्याबाहेर हे पोस्टर्स लागले आहेत. यामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. "महाराष्ट्रची पहिला महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे!", असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये दोन वेळा अजित पवार यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. त्याचबरोबर अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल असं निलेश लंके यांनी केलं होत.तेव्हापासून या चर्चा सुरू झाल्या आहेत.