Barsu Refinery Protest : डोकं फुटलं तरी पुढं जाणार...; भू सर्वेक्षण रोखण्यावर महिला आंदोलक ठाम

Barsu Refinery Protest Women protestors stand firm on their stand Refinery Latest Marathi News
Barsu Refinery Protest Women protestors stand firm on their stand Refinery Latest Marathi News

बारसू रिफायनरी विरोधातलं आंदोलन आणखी तीव्र होताना दिसत आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे माती सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. यावेळी भू सर्वेक्षण केलं जात असताना आंदोलकांनी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सरकारच्या वेगवेगळ्या आश्वासनांनंतर देखील माती परिक्षण थांबवण्यावर आंदोलक ठाम आहेत.

या दरम्यान पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. यावेळी महिलांना मारहाण झाल्याचा दावा काही आंदोलकांनी केला आहे. पोलीसांकडून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न होत असताना देखील आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.

भू सर्वेक्षणाच्या जागेकडे निघालेल्या महिला आंदोलकांना पोलिसांकडून रोखण्यात आलं. मात्र यानंतर देखील आम्ही पुढे जाणारच अशी भूमिका शेतकरी महिलांनी घेतली.

Barsu Refinery Protest Women protestors stand firm on their stand Refinery Latest Marathi News
Barsu Refinery protest : बारसू आंदोलन चिघळलं! पोलिसांची महिलांना मारहाण; व्हिडीओ काढणाऱ्याचा फोन हिसकावला

आम्ही मागे हटणार नाही. मारलं तरी आम्ही पुढे जाणार. सात-आठ बायकांना पोलीसांनी मारलं. काहीही झालं तरी जाणार आहोत. अगदी डोकं फुटलं तरी आम्ही पुढे जाणार आणि आमची जमीन घेणारच. आम्ही अजिबात त्यांना जमीन देणार नाही आणि आंदोलन सुरूच ठेवणार असे स्थानिक महिलांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेदरम्यान सांगितलं.

Barsu Refinery Protest Women protestors stand firm on their stand Refinery Latest Marathi News
Barsu Refinery Project : अश्रूधूर नाहीच! आंदोलकांनी वणवा लावल्याचा उदय सामंत यांचा दावा

बारसू रिफायनरीच्या प्रकल्पाला स्थानिकांकडून सध्या जोरदार विरोध होताना दिसत आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे माती सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. याला विरोध करत स्थानिकांनी आपलं आंदोलन तीव्र केलं आहे. हे सर्वेक्षण बंद पाडण्यासाठी गावकरी विरोध करत आहेत.

दरम्यान, आंदोलनस्थळावर पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गावकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. माती सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या या आंदोलकांचा रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला . आंदोलकांना मागे फिरवण्यात आलं त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी आंदोलक त्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com