गणेशोत्सवात कोरोनाबाबत दक्षता घ्या - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 19 August 2020

कोरोनायुद्धाच्या मध्यावर आपण काही ठिकाणी शिखराकडे गेलो तर काही ठिकाणी जात आहोत. गणेशोत्सव, राज्यातील कोरोना उपाययोजना यांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाद्वारे घेतला..

मुंबई -  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा, या काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनायुद्धाच्या मध्यावर आपण काही ठिकाणी शिखराकडे गेलो तर काही ठिकाणी जात आहोत. त्यामुळे गाफील न राहता आतापर्यंत ज्या उपाययोजना सुरू आहेत, त्या यापुढेही नेटाने राबवाव्यात, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. गणेशोत्सव, राज्यातील कोरोना उपाययोजना यांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाद्वारे घेतला. बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी सहभागी झाले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गणेशोत्सवासाठीचे मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक राज्यात सर्वांसाठी एकसारखे असावे, अशी सूचना गृह विभागाला केली आहे. द्रवरूप ऑक्‍सिजन पुरवठ्याकडे मुख्य सचिवांनी लक्ष द्यावे. त्याचे दर वाढणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. 
- अजित पवार, उपमुख्यमंत्री 

टेलीआयसीयू सुविधा सध्या भिवंडीत सीएसआरच्या माध्यमातून ही योजना सुरू असून, राज्यात तिचा विस्तार करण्याची आवश्‍यकता आहे. 
- डॉ. राजेश टोपे, आरोग्यमंत्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be careful about corona in Ganeshotsav says Uddhav Thackeray