esakal | रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे व्हा- मुख्यमंत्री
sakal

बोलून बातमी शोधा

रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे व्हा- मुख्यमंत्री

तरूणांनी रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे व्हा असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे

रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे व्हा- मुख्यमंत्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तरूणांनी रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे व्हा असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. केवळ रोजगार न मागता रोजगार निर्मिती करावी यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेंतर्गत मदत मिळेल. यावर्षी या योजनेला पाचशे कोटीची तरतूद केली आहे. योजनेला मिळणारा प्रतिसाद बघता पुढच्या वर्षी एक हजार कोटी किंवा दोन हजार कोटी देण्याची तयारी आहे, कारण यातून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार होतील आणि रोजगाराला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

राज्यातील युवा उद्योजकांसाठी स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणाऱ्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’चा शुभारंभ मुंबईतील वरळी येथील एन.एस.सी.आय. डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडिअम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, उद्योग सचिव तथा विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष पी.अन्बलगन आदी उपस्थित होते.

लघु उद्योजक, अंमलबजावणी यंत्रणा, बॅंकेचे अधिकारी व विविध औद्योगिक संघटना यांचे प्रतिनिधी यांच्यासह सुमारे 2000 युवक-युवती या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते.

loading image
go to top