

मुंबई - महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती आपलं संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक शेतकरी नेते बीआरएस पक्षाच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे बीआरएस आगामी काळात आव्हान देणार अशी चिन्हे दिसत असली, तर त्यांना किती यश मिळत हे पाहावं लागणार आहे. मात्र एका नेत्याने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे बीआरएस चर्चेत आलं आहे.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे शेतकरी, शेतमजुर यांच्या उपस्थितीत बीआरएसचे नेते माजी आमदार राजू तोडसाम यांनी मोर्चा काढला. त्या दरम्यान त्यांनी पालकमंत्री, लोकप्रतिनिधींवर बॉम्ब हल्ला करण्याचा सल्ला उपस्थित शेतकरी आणि नागरिकांना दिला.
शेतीच्या झालेल्या नुकसानीकडे कुणी लक्ष देत नाही. यात आपलीच चुक असून यापुढे कोणत्याही लोकप्रतिनिधींवर बॉम्ब हल्ला करा, असा सल्ला राजू तोडसाम यांनी सभेला संबोधित करताना दिला. या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.