Accident News : टेम्पोने दुचाकीस्वाराला एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं; दोन अपघातात तिघांचा मृत्यू

Accident News
Accident News esakal
Updated on

बीडः बीडमध्ये आज अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत. एका घटनेमध्ये तर दुचाकीस्वाराला टेम्पोने एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. दोन अपघातांच्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत.

पहिला अपघात बीड-परळी महामार्गावरील दिंद्रुड जवळील सरस्वती नदीच्या पुलावर घडला आहे. एका भरधाव वेगातील टेम्पोने दुचाकीला पाठीमागून धडक देऊन जवळपास 1 किलोमीटर फरफटत नेलं. यात दुचाकीस्वार अशोक ठोंबरे हा जखमी झाला होता.

हेही वाचाः What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा अक्षरशः चुरडा झाला असून संबंधित टेम्पो चालक फरार आहे.

दुसरा अपघात मांजरसुंबा-केज रस्त्यावर झाला आहे. दोघेजण वडमाऊली दहिफळ येथे यात्रेनिमित्त गेले होते. दर्शन आटोपून गावकडे जाताना हा अपघात घडला. एका ट्रॅ्व्हल्सने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये विकास पवार व विजय आव्हाड यांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com