Ashok Shirsat MPSC Success: शेतहमालाच्या मुलाची एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून राज्य कर निरीक्षक पदासाठी गवसणी ;आरंणगाव येथील ग्रामस्थांकडून मिळालेल्या यशाबद्दल अशोक शिरसाटचा सत्कार

Farmer Labourer's Son Clears MPSC Exam: बीड जिल्ह्यातील आरंणगावच्या शेतहमालाच्या कुटुंबातील अशोक युवराज शिरसाट यांनी नवव्या प्रयत्नात MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षक पदावर निवड मिळवली.
Ashok Shirsat MPSC Success

Ashok Shirsat MPSC Success

esakal

Updated on

अनंत जाधव

आईने दुसऱ्याच्या शेतात शेतमजुरी आणि वडीलांनी कारखान्यावर हमाली आणि कष्ट करून आपल्या मुलांचे अधिकारी होण्यासाठी खंबीर पाठबळ दिल्यामुळे आणि घरातील आठरा विश्वदारिद्रीय दुर करण्यासाठी आपले स्वप्न साकार करण्यासाठी मुलानेही जिद्द सोडली नाही, रात्रंदिवस अभ्यास करत आणि सातत्य ठेवत जिद्द, चिकाटी , मेहनत ,अथक परिश्रमाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत आई-वडिलांचे स्वप्न साकार करून मान उंचावली आहे. आरंणगाव (ता.केज जि.बीड) येथील शेत हमालाच्या कुटूंबातील अशोक युवराज शिरसाट यांने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात वंजारी जातीमध्ये पाचवा क्रमांक मिळवून यश संपादन करत राज्यकर निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.त्याबद्दल गावातील ग्रामस्थांनी अशोक शिरसाटसह आई -वडीलांचा अंगावर गुलाल उधळून पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com