Gramsevak Attack Nadlagav Incident
esakal
बीड : जिल्ह्यातील नादलगाव येथे ग्रामरोजगार सेवकाला जातिवाचक शिवीगाळ करून गंभीर मारहाण (Gramsevak Attack Nadlagav Incident) करण्याची धक्कादायक घटना ६ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. आदिवासी समाजातील जालिंदर सुरवसे (वय ३५) यांच्यावर गावातील काही गुंडांनी घरात घुसून हल्ला केला आणि त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.