Beed News: मांजरा पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर; धरणात 'इतका' जिवंत पाणीसाठा

Manjara Dam Latest Update: मांजरा नदीकाठच्या बीड, लातूर, धाराशिवसह कर्नाटकातील बीदर जिल्ह्यातील गावातील नागरिकांना अतिसावधानतेचा इशारा
Beed News: मांजरा पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर; धरणात 'इतका' जिवंत पाणीसाठा
Updated on

Latest Rain Update: तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणात बुधवारी (ता.११) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घेतलेल्या नोंदीनुसार ७६.९० टक्के जिवंत पाणीसाठा जमा झाला आहे.

त्यामुळे हे धरण कधीही पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची माहिती लातूर येथील पाटबंधारे विभाग क्रमांक-१ चे कार्यकारी अभियंता ए. एन. पाटील यांनी बीड, लातूर, धाराशिवसह कर्नाटकातील बीदर येथील जिल्हाधिकाऱ्यांना कळविली आहे. त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावात राहणाऱ्या नागरिकांना अतिसावधानतेचा इशारा देण्याचे चारही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com