

Trupti Desai: भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांना बीड पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. देसाई यांनी बीड पोलिस दलातील काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आरोप केले होते. परंतु त्याबाबतचे पुरावे दिलेले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पुरावे घेऊन चौकशीला बोलावलं आहे.