Video : काका-पुतण्याचं राजकारण! काय आहे बीडच्या क्षीरसागर घराण्याचा इतिहास?

Jaudutt kshirsagar sandeep kshirsagar
Jaudutt kshirsagar sandeep kshirsagar esakal

राज्यामध्ये पवार, विखे, पाटील, थोरात, निंबाळकर अशी मोठी घराणी आहेत. त्यातच आणखी एक नाव येतं ते म्हणजे बीडच्या क्षीरसागर कुटुंबाचं. क्षीरसागर घराणं हे अल्पसंख्यक समाजातून पुढे आलेलं आहे. तरीही या कुटुंबाची समाजातल्या सर्व घटकांवर जी पकड आहे, त्याला तोड नाही.

मागच्या ४५ वर्षांपासून बीड जिल्ह्यात क्षीरसागरांचं मोठं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. क्षीरसागर या नावाशिवाय बीड जिल्ह्याच्या राजकारणाला पूर्णत्व येऊच शकत नाही... चला तर मग या क्षीरसागर घराण्याचा इतिहास आणि आज या कुटुंबाच्या एकीची झालेली दूरवस्था बघूया.

महाराष्ट्राने इतिहासात अनेक काका-पुतण्यांचे वैर अनुभवलेले आहे. पेशवाईतल्या 'काका मला वाचवा'पासून सुरु झालेला हा प्रवास आज अनेक राजकीय घराण्यांमध्ये दिसू येतो. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या घरामध्ये जे झालं तेच स्व. गोपीनाथराव मुंडेंच्या कुटुंबात झालं.. तेच अनिल देशमुखांच्या कुटुंबात आणि तेच बीडच्या क्षीरसागर कुटुंबात!

Jaudutt kshirsagar sandeep kshirsagar
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबियांची सुरक्षा कमी केली नाही, गृह विभागाचे स्पष्टीकरण

क्षीरसागर घराण्याचा इतिहास सुरु होतो तो स्व. केशरकाकू क्षीरसागार यांच्यापासून. १९८० मध्ये केशरकाकू पहिल्यादा बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या. पुढे १९८४ला त्या पुन्हा निवडून गेल्या. १९९०ला बबनराव ढाकणे आणि १९९१ला पुन्हा केशरकाकू तिसऱ्यांदा खासदार झाल्या. तीन टर्म त्या बीड जिल्ह्याच्या खासदार होत्या.

ज्या काळात महिला ग्रामपंचायतमध्येही दिसायच्या नाही, त्या काळात बीडच्या केशरकाकू लोकसभा गाजवाच्या. देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींना काकूंचं खूप कौतुक होतं. त्यामुळे बीडसाठी अनेक प्रकल्प त्यांनी सहजासहजी मंजूर करुन आणले. काकूंमधला आत्मविश्वास बीड जिल्ह्याने अनुभवलेला आहे.

Jaudutt kshirsagar sandeep kshirsagar
ED : ज्यांचे कनेक्शन असेल त्यांची चौकशी सुरु असेल; मुंबईतील छापेमारीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

स्व. केशरकाकूंना चार मुलं आणि चार मुली. त्यापैकी दोन मुलं ही प्रत्यक्ष राजकारणात आहेत. राज्याला परिचित असलेले आणि कुटुंबात सर्वात ज्येष्ठ असलेले जयदत्त क्षीरसागर, रवींद्र क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर आणि विठ्ठल क्षीरसागर. जयदत्त आणि भारतभूषण क्षीरसागर हे प्रत्यक्ष राजकारणात आहेत. मात्र रवींद्र क्षीरसागर हे पूर्वीपासून अप्रत्यक्षपणे राजकारणात होते. गावची ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यापासून ते राजकारणात असलेल्या दोन्ही बंधूंना बळ देण्याचं काम रवींद्र क्षीरसागर करायचे.

मात्र नंतर रवींद्र क्षीरसागर यांची मुलगे राजकारणात आली. ज्येष्ठ चिरंजीव संदीप हे सध्या बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. २००७ मध्ये पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून संदीप यांनी राजकारणात एन्ट्री केली. नंतर जिल्हा परिषद आणि आता आमदार. क्षीरसागर घराण्यात वादाची ठिणगी पडली ते २०१७मध्ये. निमित्त होतं बीड नगर पालिका निवडणुकीचं. आपल्या कार्यकर्त्यांना तिकिटं द्यावीत, अशी त्यांची मागणी होती.

भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे २५-३० वर्षांपासून नगर पालिका होती. त्यांचे चिरंजीव डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचं नगर पालिकेत लक्ष वाढलं होतं. त्यामुळे संदीप यांची मागणीकडे दुर्लक्ष केल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळेच २०१७मध्ये भारभूषण क्षीरसागर राष्ट्रवादीकडून तर संदीप यांचे वडील रवींद्र क्षीरसागर हे काकू-नाना विकास आघाडी या नावाने स्वतंत्र गट स्थापन करुन निवडणूक लढवली.

संदीप क्षीरसागरांच्या नेतृत्वात झालेल्या त्या पहिल्या निवडणुकीत त्यांना मोठ यश मिळालं. जनतेतून नगराध्यक्षपदाची निवड होती, त्यामुळे भारतभूषण नगराध्यक्ष झाले. पुण्याचे जास्त नगरसेवक आणि काका नगराध्यक्ष; अशी परिस्थिती निर्माण झाल्याने, नगर पालिकेत वेगळंच राजकारण रंगलं होतं.

पुढे संदीप क्षीरसागरांनी विजयाची घोडदौड कायम ठेवली. राष्ट्रवादीकडून संदीप यांना पाठबळ मिळत गेलं आणि नाईलाजाने जयदत्त, भारतभूष यांना पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करावा लागला. राष्ट्रवादीची ताकद मिळाल्याने संदीप यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायता यामध्ये वर्चस्व मिळवलं.

२०१९ला राष्ट्रवादीने संदीप यांना तिकिट दिलं तर जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेकडून लढावं लागलं. संदीप यांना 99 हजार 934 तर जयदत्त क्षीरसागर यांना 97 हजार 950 मते मिळाली. साधारण दोन हजार मतांनी जयदत्त क्षीरसागर पराभूत झाले. चारवेळा आमदार आणि राष्ट्रवादी-काँग्रेसच्या काळात वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री राहिलेले जयदत्त क्षीरसागर पुतण्याकडून पराभूत झाले.

२०१९च्या निवडणुकीपर्वी शिवसेनेत आलेल्या आणि तीन वर्षे शिवसेनेत राहिलेल्या जयदत्त क्षीरसागरांची २२ ऑक्टोबर २०२२ रोजी शिवसेनेतून (ठाकरे गट) हकालपट्टी करण्यात आली. पक्षांतर्गत नाराजी, पक्षसंघटनेत काम न करणे आणि देवेंद्र फडणवीसांची जवळीक, यामुळे त्यांना पक्षातून बाहेर काढलं गेलं.

पुतण्याच्या राजकीय मुत्सुद्दीगीरीपुढे जयदत्त क्षीरसागर, भारभूषण क्षीरसागर यांची मोठी पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळत आहे. क्षीरसागरांपुढे सध्या भाजप हाच एकमेव पर्याय दिसतोय. परंतु शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्या जागावाटपात बीड विधानसभेची जागा कुणाला सुटते, यावर क्षीरसागरांचं राजकीय गणीत अवलंबून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com