CM Eknath Shinde News: BMCचा CM शिंदे सरकारला दणका! PM मोदींच्या दौऱ्याआधी केली मोठी कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde News

CM Eknath Shinde: BMCचा CM शिंदे सरकारला दणका! PM मोदींच्या दौऱ्याआधी केली मोठी कारवाई

Eknath Shinde News: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. जवळ जवळ दीड लाख लोक या सभेला हजर राहतील यासाठी दोन्ही पक्षानी प्रयत्न केले आहेत.

मुंबईत या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुंबईत शिंदे गट आणि भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे यांचे मोठमोठे बॅनर्स आणि कटआऊट्स लावण्यात आले आहेत.

दरम्यान दादरच्या शिवसेना भवनासमोरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे कटआऊट्स लावलण्यात आले होते. मात्र, मुंबई महापालिकेने कारवाई करत आज हे कटआऊट्स काढून टाकले आहेत. त्यामुळे शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

हे ही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

Eknath Shinde Banner

Eknath Shinde Banner

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला आजचा एकच दिवस बाकी आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याच्या मार्गावर त्यांच्या स्वागताचे कटआऊट्स आणि बॅनर्स लावण्यात आलेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही मुंबईत ठिकठिकाणी कटआऊट्स लावण्यात आले आहेत. दादरच्या शिवसेना भवनासमोरही मोठमोठे कटआऊट्स लावण्यात आले होते. मात्र, हे कटआऊट्स काढण्यात आले आहेत.

हेही वाचा: Sikander Sheikh : मोठ्या वादानंतर सिकंदर शेख आणि महेंद्रसिंग गायकवाड पुन्हा कुस्तीच्या मैदानात भिडणार?

हे कटआऊट्स थेट शिवसेना भवनासमोर लावण्यात आल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने हे कटआऊट्स हटवले आहेत.

मात्र, राज्यात शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार असतानाच त्यांचेच कटआऊट्स हटवण्यात आल्याने शिंदे गटासाठी हा मोठा दणका समजला जात आहे.

हेही वाचा: Shivsena : एकीकडे PM मोदींच्या दौऱ्यावर कडाडून टीका अन् तिकडं 'सामना'त भाजपची पानभरून जाहिरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या मुंबईत दौऱ्यात त्यांच्या हस्ते अनेक विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत.