"आधी रक्तदान करा, मगच लस घ्या"; सरकारचं आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

blood donation

"आधी रक्तदान करा, मगच लस घ्या"; सरकारचं आवाहन

मुंबई : राज्यातच नव्हे तर अवघ्या देशातच सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमानं घातलं आहे. या पार्श्वभूमीवर येत्या १ मे पासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. दरम्यान, जर तुम्हाला रक्तदान करायचं असेल तर लस घेतल्यानंतर काही कालावधीसाठी तुम्हाला रक्तदान करता येणार नाही, त्यामुळे "आधी रक्तदान करा, मगच लस घ्या" असं आवाहनं राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्याच्या जनतेला केलं आहे.

राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने दररोज रुग्णांची मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. त्यातच रक्ताचाही तुटवडा भासू लागला आहे. पण येत्या १ मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होत आहे. या काळात १८ वर्षांवरील सर्वांना लस घेता येणार आहे. पण एकदा लस घेतल्यानंतर पुढील ६० दिवस म्हणजेच दोन महिने रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे या तिसऱ्या टप्प्यात लस घेणाऱ्यांनी आधी रक्तदान करावं नंतरच लस घ्यावी असं आवाहन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

टॅग्स :Coronavirus