चिंचली मायाक्कादेवी यात्रेस प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

रायबाग - उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचली (ता. रायबाग) येथील मायाक्का देवीच्या यात्रेस बुधवारी (ता. 31) प्रारंभ झाला.

रायबाग - उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचली (ता. रायबाग) येथील मायाक्का देवीच्या यात्रेस आज (बुधवारी) प्रारंभ झाला.

"मायाक्का देवीच्या नावानं चांगभलं' च्या गजरात आज पहिल्या दिवसापासूनच भाविक दाखल होत आहेत. रविवारी (ता. 4 ) यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी महानैवेद्य (बोनी कार्यक्रम) व पालखी सोहळा होईल. यात्रा काळात देवस्थान कमिटीचे अध्यक्ष जितेंद्रसिंह जाधव- चिंचलीकर सरकार व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्ट, नगरपंचायत, आरोग्य खाते कार्यरत आहे. वीज, पाणी, शौचालयाबरोबर अन्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ठिकठिकाणी पथदीपांची सोय केली आहे. दूध ओढ्यावर भाविकांच्या स्नानासाठी विशेष सोय केली आहे. यात्रेत मिठाई, खेळणी, हॉटेल्स, घरगुती साहित्य विक्रीची दुकाने दाखल झाली आहेत. तसेच जातीवंत जनावरांचा बाजार भरला असून यंदाही मोठी उलाढाल अपेक्षित आहे. मराठी शाळेत तात्पुरते पोलिस स्थानक स्थापन करून चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच सुरळीत वाहतुकीसाठीही प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्र-कर्नाटकातील विविध आगारांतून जादा बसची सोय केली आहे. तसेच खासगी वाहनांनी मिळून लाखो भाविक मायाक्का देवीच्या दर्शनाचा लाभ घेणार आहेत.

Web Title: Belgaum News Chinali Mayakkadevi Yatra