सीमाप्रश्‍नी महाराष्ट्राने आश्‍वासनांना जागावे - दीपक दळवी

जितेंद्र शिंदे
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

बेळगाव - सीमाप्रश्‍नाच्या लढ्यात सक्रीय सहभाग घेऊन शिवसेनेने आजपर्यंत आश्‍वासनांना जागत आली आहे. पण, संयुक्‍त महाराष्ट्र निर्माण होत असताना सीमाप्रश्‍न सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी जी आश्‍वासने दिली होती, त्यांना जागण्याची वेळ आली आहे, असे मत मध्यवर्ती आणि शहर महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यक्‍त केले. 

बेळगाव - सीमाप्रश्‍नाच्या लढ्यात सक्रीय सहभाग घेऊन शिवसेना आजपर्यंत आश्‍वासनांना जागत आली आहे. पण, संयुक्‍त महाराष्ट्र निर्माण होत असताना सीमाप्रश्‍न सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी जी आश्‍वासने दिली होती, त्यांना जागण्याची वेळ आली आहे, असे मत मध्यवर्ती आणि शहर महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यक्‍त केले. 

रामलिंगखिंड गल्लीतील सम्राट अशोक चौकात गुरूवारी (ता. 8) सीमालढ्यात 1969 सालच्या शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. दळवी म्हणाले, व्दीभाषिक राज्याची निर्मिती करत असताना सीमाप्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन महाराष्ट्रातील नेत्यांनी दिले होते. हे अद्याप पूर्ण झाले नाही. पण, संयुक्‍त महाराष्ट्रानंतर सीमावासियांसाठी शिवसेनेने मोठे योगदान दिले. त्यांच्या त्यागावर हा लढा सुरू आहे. त्यामुळे सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट होईल, तेव्हाच हुतात्म्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन होईल. 

शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, सीमाभागात मोठ्या प्रमाणात दडपशाही, गळचेपी असतानाही अनेक ठिकाणी निवडणुकांत मराठी जनतेने भगवा फडकवला आहे. कोणतेही राजकारण न करता शिवसेना बेळगावातील मराठी जणांच्या पाठीशी आहे. शिवसेनेच्या या आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना पेन्शन मिळावी, यासाठी आपण शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. 

मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर, तालुका समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, माजी आमदार दिगंबर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, टी. के. पाटील, प्रा. सुनील शिंत्रे, खानापूर समितीचे विलास बेळगावकर, तालुका समिती युवा आघाडी अध्यक्ष ऍड. शाम पाटील, एस. एल. चौगुले, कल्लाप्पा घाटेगस्ती, सचिन गोरले, प्रकाश राऊत, प्रविण तेजम आदी उपस्थित होते. 

कोनवाळ गल्लीतही अभिवादन 

कोनवाळ गल्ली येथील सिंह गर्जना युवक मंडळ व शिवसैनिकांच्यावतीने शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. शिवसेनेचे बंडू केरवाडकर, दिलीप बैलूरकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, माजी उपमहापौर रेणु किल्लेकर, टी. के. पाटील, अभिजित सुणगार, मनोज पावशे, माजी महापौर सरिता पाटील, किरण गावडे, राहुल भोसले, नारायण पाटील, बंडू मेणसे, मोहन पाटील, बाळू केरवाडकर, गजानन जायाण्णाचे, कुलदीप कांबळे, मारूती परिट, संजय नरिन, सचिन गगवे, महेश गावडे, जितेंद्र घुमटे, अजित धांडुळे, सूरज किल्लेकर आदी उपस्थित होते.

शिवसेनेच्या हुतात्म्यांना महापौर संज्योत बांदेकर, गटनेते पंढरी परब, माजी महापौर किरण सायनाक यांनीही अभिवादन केले. 

Web Title: Belgaum News Dipak Dalavi comment