PUNE: राज्यपालांविरोधात वातावरण तापलं; आता पुण्यातही बंदची हाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

PUNE: राज्यपालांविरोधात वातावरण तापलं; आता पुण्यातही बंदची हाक

Pune: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. महाराष्ट्रातल्या महापुरुषांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यामुळे त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

त्यातच राजभवनातील एका मॅडेलचा फोटो व्हायरल होत आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला. या सर्व घटनांवर आता पुण्यात सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. पुण्यातील पुरोगामी संघटना आणि महाविकास आघाडीच्या वतीने 13 तारखेला पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. त्या अगोदर 10 डिसेंबर रोजी भव्य सन्मान यात्रा निघणार आहे.

हेही वाचा: Maharashtra Government : कुठे दगडफेक तर कुठे घोषणाबाजी, सरकारनं बसेसबाबत घेतला मोठा निर्णय; पाहा 10 अपडेट्स

यामध्ये सर्व विरोधी पक्ष सामील होणार आहेत. भाजपनं महाराष्ट्राची माफी मागावी आणि राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवावे या मागणीसाठी पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. तर महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात महाविकास आघाडीकडून मुंबईमध्ये 17 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये सर्व महाराष्ट्र प्रेमींनी सहभागी व्हावं असं आवाहन मविआच्या नेत्यांकडून करण्यात आलं आहे.राज्यपालांविरोधात जालन्यातही आज बंद पुकारला होता त्यामुळे भाजपवर दबाव वाढू लागला आहे.

टॅग्स :Pune NewsBjppuneNCP