
Namdev Shashtri: भगवान गड हा भक्कमपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे, असे या गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे. त्यांनी कोणाला पाठींबा द्यावा, हा त्यांचा अधिकार आहे. परंतु, धनंजय मुंडेंना आता गडाचा आधार का घ्यावा लागत आहे, त्यांना त्यांचा पक्ष आणि नेते दुरावत असल्याचे जाणवत आहे का, त्यामुळे ते गडाचा आधार घेत आहेत का, असे प्रश्न खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केले आहेत.