
आज सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले. तिथेच विरोधकदेखील आंदोलन करताना दिसत आहेत. दरम्यान, दोन्ही गटात बाचाबाची झाली असल्याचे पाहायला मिळालं. इतकेच नव्हे तर त्यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळालं. यानंतर भरत गोगावलें यांनी माध्यमांशी संवाद साधला. सगळा घोटाळा बाहेर काढल्याने त्यांना पोटशुळा उठला. घोटाळे बाहेर काढल्याने विरोधकांना झोंबलं असा आरोपही त्यांनी यावेळी केला. यासोबतच, ते काय धक्का बुक्की करतात आम्हीच त्यांना धक्काबुक्की करणार असा इशाराही भरत गोगावलेंनी विरोधकांना दिला.(bharat gogawale reaction about fight between ruling party and opposition in vidhimandal session)
आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे गेले चार दिवस वादळी ठरले आहेत. आजचा दिवस देखील वादळी ठरला. दरम्यान, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली असल्याचे पाहायला मिळालं.
या झालेल्या घटनेसंदर्भात बोलताना भरत गोगावलेंनी जर आमच्या अंगावर आलात तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा भाषेत विरोधकांना उत्तर दिले आहे.
काय म्हणाले भरत गोगावले?
कोव्हिडच्या काळापासून त्यांचा इतिहास आम्ही बाहेर काढला. त्यांची वस्तुस्थिती आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. आम्ही जसाच तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुले आमचा नाद करायचा नाही. त्यांनी आमचा चुकून पाय लागला तर त्यांना आम्ही नमस्कार करेन. पण त्यांचा पाय लागला तर आम्ही त्याला सोडत नाही अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
गद्दार गद्दार म्हणून आरोप करत आहेत. जे आम्ही केलं ते आमच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की बॅनरबाजी करायचं. ते जेव्हा घोषणाबाजी करत होते. तेव्हा आम्ही आलो नाही. ते किती आहेत ते तुम्हाला माहिती आहे. आम्ही १७० लोको त्यांच्या आंदोलनाला आलो असतो तर तुम्हाला समजलं असत. आम्ही काय बोलत होतो तेव्हा त्यांनी यायला नको होतं. याच अर्थ त्यांना झोंबलं. मिरची जशी चावल्यानंतर झोंबते तशी त्यांना झोंबली. कारण त्यांचा आम्ही इतिहास बाहेर काढला.
आम्ही बोलताना त्यांनी येऊन पायऱ्यांवर गोंधळ घालायचा हा कुठला प्रकार आम्ही काय बांगड्या भरल्यात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही जसात तसे उत्तर त्यांना आम्ही दिले आहे.
धक्काबुक्की बद्दल विचारल्यानंतर येवढ्या गर्दी मध्ये होते आम्हीपण ढकलल. जे आमच्याकडे आले त्यांना आम्ही सरळ मार्गाने सोडू असा उलट सवाल त्यांनी उपस्थित केला.
सत्तेत त्यांच्यासोबत असताना आम्ही खायला नव्हतो काम करायला होतो. ते घरात बसून काम करत होते. आम्ही फिल्डवर काम करत होते. म्हणून आम्ही सहसलामत इथे उभे आहेत. धक्काबुक्कीच्या घटनेवर बोलताना ते म्हणाले, हा फक्त ट्रेलर होता पिक्चर अभी बाकी आहे. त्यांनी तुम्हाला धक्काबुक्की केली का असा सवाल उपस्थित केल्यानंतर ते म्हणाले, अरे हट ते काय आम्हाला धक्का बुक्की करणार आम्ही त्यांना धक्काबुक्की करणार असा इशाराही गोगावेलेंनी दिला,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.