शिंदे गटाचा नेता ठाकरे गटाच्या कार्यक्रमात झिंगाट, गोगावलेंचा Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Gogawle: शिंदे गटाचा नेता ठाकरे गटाच्या कार्यक्रमात झिंगाट, गोगावलेंचा Video Viral

Bharat Gogawle: शिंदे गटाचा नेता ठाकरे गटाच्या कार्यक्रमात झिंगाट, गोगावलेंचा Video Viral

शिंदे गटाचे नेते भरत गोगावले नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतात. दरम्यान, त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये ते डान्स करताना पाहायला मिळत आहेत. त्याचा हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Bharat Gogawle Dance video viral)

शिंदे गटाचे नेते भरत गोगावले नुकतेच ठाकरे गटाच्या नेत्याच्या लग्नात सहभागी झाले. यावेळी त्यांनी स्टेजवर डान्सदेखील केला. राज्यात शिवसेनेचे बंडखोर आणि ठाकरे गटाचे नेते यांच्यातला वाद टोकाला पोहचले असतानाच गोगावलेंचा हा व्हिडीओ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल तालुक्याचे ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या मुलीच्या लग्नाचा हा कार्यक्रम होता. शिंदे गटाचे आमदार आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते भरत गोगावले या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले.

लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात भरत गोगावले आले. त्यांनी पाटील यांच्या मुलीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच तेथे हळदीच्या कार्यक्रमात सुरू असलेल्या डान्सवर ठेकाही धरला. भरत गोगावले यांचा हाच व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

ठाकरे गटाच्या तालुका अध्यक्षांच्या लग्न सोहळ्यात अगदी बेधुंद होऊन नाचताना दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. भरत गोगावले हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. महाड विधानसभा संघाचे आमदार आहेत. शिंदे गटाने केलेल्या बंडात त्यांचा मुख्य सहभाग होता.

टॅग्स :Eknath Shinde