भारत जोडो यात्रा! माजीमंत्री नसीम खान यांच्या गाडीला नांदेडमध्ये अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

भारत जोडो यात्रा! माजीमंत्री नसीम खान यांच्या गाडीला नांदेडमध्ये अपघात

नांदेड - काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा लवकरच महाराष्ट्रात दाखल होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जय्यत तयारी सुरू आहे. मात्र त्याआधीच यात्रेला धक्का बसला असून काँग्रेसनेते आणि माजी मंत्री नसीम खान यांच्या गाडीला नांदेड येथे अपघात झाला आहे. (Bhjarat Jodo Yatra news in Marathi)

हेही वाचा: पुढच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तुम्ही की शिंदे? फडणवीस म्हणाले आमच्याकडे...

भारत जोडो यात्रा नांदेडमधून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. भारत जोडो यात्रेसाठी नसीम खान हैद्राबादमधून नांदेडला येत होते. त्याचवेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात नसीम खान यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

भारत जोडो यात्रेत याआधी काँग्रेसनेते आणि माजी मंत्री नितीन राऊत यांना देखील दुखापत झाली होती. कुणाचा तरी धक्का लागल्याने ते कोसळले होते. यात त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली होती.

टॅग्स :NandedCongressaccident