Bharat Jodo Yatara: राहुल गांधींना मिळाले खास गिफ्ट; इंदिरा गांधींच्या आठवणीत झाले भावुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatara: राहुल गांधींना मिळाले खास गिफ्ट; इंदिरा गांधींच्या आठवणीत झाले भावुक

Bharat Jodo Yatara: राहुल गांधींना मिळाले खास गिफ्ट; इंदिरा गांधींच्या आठवणीत झाले भावुक

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज ४० वा दिवस आहे. देशभरात या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, राहुल गांधींना एका वृद्ध महिलेने दिलेल्या खास गिफ्टची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर त्या गिफ्टचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. (bharat jodo yatra Rahul Gandhi was deeply moved by listening to the story of the most precious gift two cucumbers)

यात्रेदरम्यान, एक वृद्ध महिला राहुल गांधींसाठी आपल्या शेतातून काकड्या घेऊन आली होती. यावेळी ती इंदिरा गांधी यांच्या नावाचा उल्लेख करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

माझं कुटुंब खूप गरीब आहे. माझ्याजवळ संपत्तीच्या नावाखाली एक शेतच आहे. जे तुमची आजी इंदिरा गांधी यांच्या भूमी सुधार अधिनियमामुळे मिळालं होतं. ही काकडी त्याच शेतातील आहे. अस त्या वृद्ध महिलेने राहुल गांधी यांना सांगितले.

तसेच, तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे सर्वात महागडी भेटवस्तू हीच आहे, असे म्हणताना या वृद्ध महिलेचे डोळे पाणावले होते. त्यावेळी, राहुल गांधींनी त्या वृद्ध महिलेची गळाभेट घेत तिच्याकडील काकडी हातात घेतली. महिलेने राहुल गांधींना आशीर्वाद दिला अन् ते पुढे निघाले.

राहुल गांधींच्या यात्रेत दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आठवणी जागल्या जात आहेत दोनच दिवसांपूर्वी इंदिरा गांधींच्या मतदारसंघातून राहुल गांधींची यात्रा गेली. त्यावेळी, हा भावनिक प्रसंग घडला. हे पाहून राहुल गांधीही गहिवरले.

भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारी येथून सुरू झाली आहे. आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यातून गेली आहे. भारत जोडो यात्रा 9 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीपी सुप्रिमो शरद पवार आणि सुप्रिया सुळे त्यांचं स्वागत करण्याची शक्यता आहे.