Bharat Jodo Yatra : लोकशाही वाचवण्यासाठी यात्रेत; आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन; राहुल गांधींसोबत सहभाग
Bharat Jodo Yatra Yatra to Save Democracy Aditya Thackeray nanded
Bharat Jodo Yatra Yatra to Save Democracy Aditya Thackeray nanded

नांदेड : ‘संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी आपण लढत आहोत. देशात घटनाबाह्य काम सुरु असल्यानेच आम्ही भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहोत’, अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केली. यात्रेत सहभागी होण्यापूर्वी शुक्रवारी त्यांनी येथील विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला.

आदित्य ठाकरे हे नांदेडहून प्रथम पार्डी मक्ता येथील राहुल गांधी यांच्या कँपवर पोचले. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. त्यानंतर तिन्ही नेते एकाच मोटारीने चोरांबा फाट्याकडे रवाना झाले. ठाकरे म्हणाले, ‘चार महिन्यांपूर्वी राज्यात घटनाबाह्य सरकार आले आहे. अशाच वागणुकीमुळे आपल्याला आणि देशाला धोका आहे. संजय राऊत यांच्याबाबतचा न्यायालयाचा निकाल पाहिला तर, त्यात त्यांना कशा पद्धतीने अडकविण्यात आले आहे, हे लक्षात येईल. म्हणूनच आम्हीही या यात्रेत सहभागी होत आहोत’.

ठाकरेंसोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार सुभाष वानखेडे होते. वानखेडे यांच्यासह इतर शिवसैनिकांनी गळ्यात भगवे उपरणे टाकून पदयात्रेत सहभाग नोंदविला. हिवरा फाट्यापासून या सर्वांनी एकत्रित अंतर पूर्ण केले.

हवा मात्र ठाकरेंचीच

पदयात्रा राहुल गांधींची, पण हवा आदित्य ठाकरेंची, असे चित्र आज पाहायला मिळाले. महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त नेतेच नांदेडमध्ये पदयात्रेत सहभागी झाले होते. आदित्य ठाकरे यांनी शक्तिप्रदर्शनासाठी शिंदे गटात गेलेल्या आमदार संतोष बांगर यांचा कळमनुरी मतदारसंघ निवडल्याची चर्चा होती. कॉँग्रेसच्या बरोबरीने शिवसैनिकांनी यात्रेत सहभाग नोंदवित, ‘पन्नास खोके एकदम ओक्के’ अशा घोषणा देत यात्रा दणाणून सोडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com