Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप, काँग्रेसचे 2 आमदार पक्षाला ठोकणार रामराम!

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsEsakal

राज्यात सत्तांतर झाल्यापासून विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. अशातच काही नेते पक्ष सोडण्याच्या भूमिकेत आहेत. तर काही नेते पक्ष सोडणार असल्याचे दावे अनेक नेते करताना दिसून येतात. अशातच आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे दोन आमदार पक्षाची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसचे 2 आमदार भाजप-शिवसेनेमध्ये नाही तर चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस या पक्षात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय एक अपक्ष आमदार आणि आपचे नेतेही चंद्रशेखर राव यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे.

छत्रपती संभाजी नगरमध्ये पार पडणाऱ्या सभेमध्ये आपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते चंद्रशेखर राव यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट हरिभाऊ राठोड यांनी केला आहे.

Maharashtra Politics
BMC Election: "ठरलं! मुंबईत भाजपचा महापौर, शिंदे-RPI ला अडीच-अडीच वर्ष उपमहापौर पद"

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी काहीच महिन्यांपूर्वी तेलंगणा राष्ट्रसमिती अर्थात टीआरएसचं नाव बदलून बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती केलं आहे. चंद्रशेखर राव यांनी काहीच दिवसांपूर्वी चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये सभा घेत महाराष्ट्रातही प्रवेश केला आहे.

दरम्यान बीआरएसमध्ये प्रवेश करणारे काँग्रेसचे ते दोन आमदार कोण आहेत? याबाबत आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी 13 आमदार गैरहजर राहिले होते, तेव्हापासून काँग्रेसच्या या आमदारांबाबत शंका उपस्थित केली जात आहे. याशिवाय मागच्या वर्षी जून महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्येही काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं होतं, ज्यामुळे काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता.

Maharashtra Politics
Sharad Pawar: "पदवीचं काय घेऊन बसलात ?" अदानीच्या पाठोपाठ मोदींच्या समर्थनार्थ पवारांची बॅटिंग!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com