मोठा निर्णय! नववी-दहावीच्या वर्गासाठी किमान २०-२० पटसंख्येची अट शिथिल; शालेय शिक्षणमंत्र्यांची अधिकाऱ्यांसमवेत बैठक, ‘या’ ३ पैकी एक निर्णय फायनल

इयत्ता नववी व दहावीच्या दोन्ही वर्गात किमान २०-२० पटसंख्या नसलेले वर्ग किंवा शाळा बंद कराव्या लागणार आहेत. कारण, पटसंख्येच्या निकषांनुसार तेथील शिक्षक अतिरिक्त होतात. त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांनी पटसंख्येची अट शिथिल करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी विधानभवनात शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
teacher problem

education minister Dada Bhuse

esakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता नववी व दहावीच्या दोन्ही वर्गात किमान २०-२० पटसंख्या नसलेले वर्ग किंवा शाळा बंद कराव्या लागणार आहेत. कारण, पटसंख्येच्या निकषांनुसार तेथील शिक्षक अतिरिक्त होतात. त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांनी पटसंख्येची अट शिथिल करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी विधानभवनात शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात दोन्ही वर्गात किमान २०-२० पटाची अट शिथिल करण्याचा निर्णय झाला आहे. पुढील आठवड्यात त्याचा शासन निर्णय निघणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com