'एमपीएससी'चे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पेपर होणार ऑनलाइन ! उमेदवारांना मिळणार उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी

1car01_10_0.jpg
1car01_10_0.jpg
Updated on: 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता अन्य राज्यांच्या धर्तीवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्‍नपत्रिकांची परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विश्‍वसनिय संस्थेची निवड केली असून प्रारंभी कमी उमेदवार असलेली मुख्य परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे. तत्पूर्वी, विद्यार्थ्यांना त्यासंबंधीचा डेमो दाखविला जाणार असून त्यानंतर परीक्षा ऑनलाइन घेण्याचा अंतिम निर्णय होईल, असेही सांगण्यात आले. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीनुसार उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी दिली जाईल, असेही आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

ऑनलाइन परीक्षेसंदर्भातील ठळक मुद्दे...

  • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग घेणार आता वस्तुनिष्ठ बहूपर्यायी प्रश्‍नपत्रिकांची ऑनलाइन परीक्षा
  • आयोगाने निवीदा काढून परीक्षेसाठी नियुक्‍त केली विश्‍वसनिय संस्था; आयआयटीसह अभियांत्रिकीची सीईटी परीक्षा घेते ती संस्था
  • ऑनलाइन परीक्षेपूर्वी होणार ट्रायल; मॉक टेस्टद्वारे उमेदवारांच्या अडचणींवर केली जाणार मात
  • जेईई, नीट, सीईटीच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा
  • प्रारंभी कमी उमेदवार असलेली परीक्षा होणार ऑनलाइन; त्यातील त्रुटी दूर करुन बहूपर्यायी प्रश्‍नपत्रिका असलेल्या सर्वच परीक्षा होणार ऑनलाइन
  • ऑनलाइन परीक्षा होणार पुढच्या वर्षी; ऑनलाइन परीक्षा घेण्यासंदर्भात स्वॉप्टवेअर तयार करण्याचे काम आयोगाने हाती घेतले
  • परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांच्या मागणीनुसार मिळणार उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी; परीक्षा पारदर्शकच होणार असल्याचा आयोगाला विश्‍वास
  • आता होणाऱ्या पूर्व परीक्षांपैकी सर्वात कमी उमेदवार तथा भरावयाच्या जागा कमी असलेल्या विभागाची मुख्य परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियोजन 

देशातील केरळ, गुजरात, तेलंगणा, ओरिसा यासह अन्य काही राज्यांमधील आयोगातर्फे सर्वच पदांची मुख्य परीक्षा ऑनलाइन घेतली जात आहे. ज्या पदांचे पेपर वस्तुनिष्ठ बहूपर्यायी आहेत, ते पेपर ऑनलाइन घेतले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रारंभी शंभर ते दोनशे पदांसाठी दिली जाणारी मुख्य परीक्षा ऑनलाइन घेणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्य सेवेची मुख्य परीक्षा, अभियांत्रिकीची मुख्य परीक्षा ऑनलाइन घेण्याचे आयोगाचे नियोजन आहे. प्रशासनात नव्याने येणाऱ्या उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असायला हवे, परीक्षेनंतर निकालासाठी लागणारा वेळ कमी व्हावा, एका वर्षात किमान दोनवेळा परीक्षा घेणे आयोगाला सोयीस्कर व्हावे, या हेतूने ऑनलाइन परीक्षेचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाइन परीक्षा ही केवळ वस्तुनिष्ठ बहूपर्यायी प्रश्‍नपत्रिकांचीच होणार असून वर्णनात्मक प्रश्‍नपत्रिकांची तथा पेपर ऑफलाईनच होतील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. जेईई, नीटसह विविध महत्त्वाच्या अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा ऑनलाइन होऊ लागली आहे. याच धर्तीवर आयोगाची परीक्षा होणार असल्याचेही आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. आयआयटीसह अभियांत्रिकीची सीईटी व अन्य परीक्षा घेण्याचा खूप वर्षांचा अनुभव असलेली आणि कोणत्याही प्रकारची तक्रार नसलेल्या संस्थेची निवड केल्याचेही आयोगाकडून सांगण्यात आले. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहनही आयोगाने केले आहे. 

 

परीक्षार्थी उमेदवारांकडे द्यायला हवे लक्ष... 

  • आयुष्यात मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना पारदर्शकतेची हवीय खात्री 
  • महापरीक्षा पोर्टलने अनेकांची केली घोर निराशा; गैरप्रकारानंतर पोर्टल बंद केले, पण हुशार विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच नाही 
  • ऑनलाइन परीक्षेला विरोध नाही, परंतु परीक्षार्थी उमेदवारांना हवीय पारदर्शकतेची हमी; महापरीक्षा पोर्टलसारखी नकोय पुनरावृत्ती 
  • आयोगाने परीक्षा घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे द्यायलाच हवी; विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक निर्णयासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निवेदन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Latest Marathi News Live Update
Maharashtra Crop Loan Update
Satara Munawale Water Tourism Centre Reopens With Adventure Sports And Modern Freshwater Tourism Facilities
Sahil Jadhav From Satara Rises to Asian Games Gold After Six Years of Struggle Dedication and Determination in Archery
Marathi News Esakal
www.esakal.com