
सोलापूर : राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने बुधवारी (ता. ३०) घेतला. त्यानुसार आता प्रतितास २५० ते ३०० रुपये मानधन मिळणार आहे. यामुळे त्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.