Vidhan Sabha 2019 : खडसे, तावडे यांचं अखेर ठरलं! भाजपने घेतला 'हा' निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

- बावनकुळे यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील

मुंबई : एकनाथ खडसे यांनी थांबावे, असा सल्ला देत त्यांची कन्या रोहिणीला भाजपने उमेदवारी देण्याची तयारी दाखवली आहे.

विनोद तावडे यांनी आजवर पक्षासाठी केलेले काम लक्षात घेत त्यांच्याविषयी जीवदानाचे धोरण अवलंबवले जाण्याची शक्यता आहे.

बावनकुळे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्नशील आहेत, असे समजते. प्रकाश महेता यांच्याऐवजी पराग शहा किंवा प्रवीण छेडा यांचा विचार सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big decision taking BJP for Khadase and Tawade for Maharashtra Vidhan sabha election 2019