01 तारखेला भाजपमध्ये जोरदार इनकमिंग; 'हे' सात दिग्गज करणार प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

1 सप्टेंबरला सोलापूर येथे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रावादीचे माजी खासदार धंनजय महाडीक यांचा प्रवेश निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्वजण भाजपमधे प्रवेश करणार आहेत.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वछभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरुच असून येत्या 01 तारखेला भाजपमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीमधील दिग्गज नेत्यांचा प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीला भारतीय जनता पक्ष मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

1 सप्टेंबरला सोलापूर येथे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रावादीचे माजी खासदार धंनजय महाडीक यांचा प्रवेश निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्वजण भाजपमधे प्रवेश करणार आहेत.

उर्वरित प्रवेश दुसऱ्या टप्प्यात होणार असून ते 5  सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर या रोजी भाजपमधे आणखी प्रवेश होणार आहेत. यामध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, सत्यजित देशमुख यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. भाजपत जाण्यासाठी अनेक काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते भाजप नेत्यांशी संपर्कात आहेत. 05 तारखेला आणखी एकदा दिल्लीत बैठक होईल आणि त्यानंतर प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big leaders of NCP and congress may enters in BJP on 01 September