मोठी बातमी! सोलापुरातील ‘या’ १५ शाळांमधील ३३ शिक्षकांची मान्यता होणार रद्द? तत्कालीन शिक्षणाधिकारी अंधारे अन्‌ फडके यांच्या कार्यकाळातील मान्यता; ‘या’ आहेत गंभीर त्रुटी

सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व मारुती फडके यांच्या कार्यकाळातील ३३ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यतांची सखोल चौकशी झाली आहे. त्यांच्या वैयक्तिक मान्यता रद्द करून त्यांना शालार्थ आयडी देऊ नये, असा अहवाल त्रिस्तरीय समितीने शिक्षण उपसंचालकांना पाठविला. त्यानुसार सर्वांच्या कागदपत्रांची तपासणी होऊन त्यांची सुनावणी पार पडली आहे.
schools
schoolssakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व मारुती फडके यांच्या कार्यकाळातील ३३ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यतांची सखोल चौकशी झाली आहे. त्यांच्या वैयक्तिक मान्यता रद्द करून त्यांना शालार्थ आयडी देऊ नये, असा अहवाल त्रिस्तरीय समितीने शिक्षण उपसंचालकांना पाठविला. त्यानुसार सर्वांच्या कागदपत्रांची तपासणी होऊन त्यांची सुनावणी पार पडली आहे. आता त्या १५ शाळांमधील ३३ शिक्षकांची वैयक्तिक मान्यता रद्द होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलेल्या मान्यतांमध्ये अनियमितता असल्याची तक्रार उपसंचालकांकडे प्राप्त झाली होती. ‘सकाळ’नेही यासंदर्भात वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्यानुसार त्रिस्तरीय समिती नेमून तत्कालीन शिक्षणाधिकारी अंधारे व फडके यांनी दिलेल्या मान्यतांची चौकशी झाली. समितीने अहवाल तयार केला. त्यात प्रस्तावाची टिप्पणी एका कर्मचाऱ्याची आणि माहिती दुसऱ्याच कर्मचाऱ्याची जोडलेली असतानाही शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रस्तावास मान्यता दिली.

रिक्त पदे एकूण दाखविली, पण त्या पदांची माहिती अर्धवट असतानाही मान्यता दिली, ५० टक्क्याच्या प्रमाणात मान्यता देणे अपेक्षित असताना देखील त्या शाळेतील एकमेव रिक्त पदालाही मान्यता दिली, अशा बाबी समोर आल्या. सोलापूर शहरातील एका शाळेने तर शिक्षकाची नियुक्ती १३ फेब्रुवारी २०२३ मध्ये केली आहे, तरीदेखील शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधितास १ ऑगस्ट २०२२ पासून वैयक्तिक मान्यता दिली आहे. तसेच शिक्षक भरतीवर निर्बंध असताना देखील मान्यता देऊन त्या काळातील नियुक्ती दाखविल्याचीही गंभीर बाब चौकशी समितीने उजेडात आणली. आता ज्यांच्या मान्यतेत अनियमितता झाली, त्यांची वैयक्तिक मान्यता रद्द होणार हे निश्चित आहे.

सोलापुरातील आहेत ‘या’ १५ शाळा

कुचन प्रशाला, भु. म. पुल्ली कन्या प्रशाला, बी. एफ. दमाणी हायस्कूल, लोकसेवा विद्या मंदिर (मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर), पंचाक्षरी माध्यमिक विद्यालय (माळकवठे, ता. दक्षिण सोलापूर), उमाबाई श्राविका विद्यालय, महात्मा फुले विद्यालय (मंद्रुप), जीवन विद्या विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय (भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर), जयशंकर हायस्कूल (तडवळ, ता. अक्कलकोट), श्री मल्लप्पा कोनापुरे हायस्कूल (आहेरवाडी), मंगरूळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (अक्कलकोट), सिल्वर जुबली हायस्कूल (बार्शी), शंकरराव आष्टे प्रशाला (भुरीकवठे), मल्लिकार्जुन विद्या विकास प्रशाला (किणी) व अहिल्याबाई माध्यमिक प्रशाला (सोलापूर) या १५ शाळांमधील ३३ शिक्षकांच्या मान्यतेचा हा विषय आहे.

मान्यतेच्या प्रस्तावातील गंभीर त्रुटी...

  • पदभरतीस बंदी असताना नियुक्ती आणि एकाच तारखेला बहुतेक शिक्षकांची नेमणूक

  • शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध न्यायप्रविष्ठ असताना लिपिकास मान्यता

  • तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता नाकारलेली असतानाही अंधारे यांनी दिल्या मान्यता

  • मारुती फडके यांच्याकडे शिक्षणाधिकारी म्हणून पदभार, तरी अंधारे यांनी दिल्या मान्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com