

सोलापूर : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कला अध्यापक विद्यालयातील सेवेस १२ व २४ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना आता निवड व वरिष्ठ वेतनश्रेणी मिळणार आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) पात्र शिक्षकांची नोंदणी सुरू केली आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या पगारात वाढ होणार आहे.
शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यावर सेवेला १२ वर्षे पूर्ण झालेल्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी दिली जाते. तर २४ वर्षे पूर्ण झालेल्यांना निवड वेतन श्रेणी मिळते. त्याअंतर्गत शिक्षकांना काही दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागते. त्याची सशुल्क सोय ‘एससीईआरटी’कडून केली जाते. संचालक राहूल रेखावार यांनी शुक्रवारी (ता. ११) त्यासंबंधीचे परिपत्रक काढून शिक्षणाधिकारी व डाएट प्राचार्यांना पाठविले आहे. आता मंगळवारपासून (ता. १५) वेतनश्रेणीसाठी पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू होणार आहे. पण, नोंदणीसाठी पुन्हा कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, असेही त्यांनी त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे.
ठळक बाबी...
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील तसेच कला व शारीरिक शिक्षक (मान्यताप्राप्त) या चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करावी लागणार
प्रशिक्षणासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या https://www.maa.ac.in या संकेतस्थळावरील ‘प्रशिक्षणे’वरील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणवर क्लिक करून पुढील माहिती भरावी
३० एप्रिल २०२५ पर्यंत सेवेस १२ वर्षे पूर्ण झालेल्यांनाच भरता येईल वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी अर्ज, तर ३० एप्रिल २०२५ रोजी २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्यांना करता येईल निवडश्रेणी प्रशिक्षणाची नोंदणी
प्रशिक्षण नोंदणीसाठी मुदतवाढ मिळणार नाही, १५ ते २५ एप्रिलपर्यंतच राहील मुदत, ‘डाएट’च्या माध्यमातून प्रशिक्षण प्रत्येक जिल्ह्यात ऑफलाइन पद्धतीने होईल
प्रशिक्षणासाठी प्राथमिक (पहिली ते चौथी, पहिली ते पाचवी, पहिली ते सातवी, पहिली ते आठवी व सहावी ते आठवी), माध्यमिक (इयत्ता नववी ते दहावी), उच्च माध्यमिक (अकरावी ते बारावी) आणि अध्यापक विद्यालय, असे चार गट केले जाणार आहेत
प्रशिक्षण सशुल्क असून त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रत्येकी २००० रुपये भरावयाचे आहेत
अधिक माहितीसाठी ९००४११९९२६, ८२०८८७९१५९ आणि ९५११८७४३७३ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करण्याची सोय उपलब्ध असेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.