मोठी बातमी! बोर्डाच्या परीक्षांचे पहिल्यांदाच जिल्हाधिकाऱ्यांकडे संपूर्ण अधिकार; प्रात्यक्षिक अन्‌ लेखी परीक्षेत कॉपी होणारच नाही; भरारी पथकात आता ‘हे’ अधिकारी

जिल्ह्यातील परीक्षा पारदर्शक तथा कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यांच्या नियोजनातूनच परीक्षा केंद्रांवर ड्रोन लावणे, भरारी पथकांचे नियोजन, सीसीटीव्ही कॅमेरे, पर्यवेक्षकांच्या मोबाईलचे कॅमेरे झूमद्वारे सुरू ठेवणे, संनियंत्रण कक्ष उभारणे, अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत.
Maharashtra Board Offline Exam News
Maharashtra Board Offline Exam News sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा यंदा कॉपीमुक्त होण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ठोस उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील परीक्षा पारदर्शक तथा कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यांच्या नियोजनातूनच परीक्षा केंद्रांवर ड्रोन लावणे, भरारी पथकांचे नियोजन, सीसीटीव्ही कॅमेरे, पर्यवेक्षकांच्या मोबाईलचे कॅमेरे झूमद्वारे सुरू ठेवणे, संनियंत्रण कक्ष उभारणे, अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १८८ तर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी १२० केंद्रे आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले की नाहीत, याची पडताळणी शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील पथकांनी केली आहे. आता इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षा २१ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक दुसऱ्या खासगी स्वयंअर्थसहाय्यिता शाळांवर बाह्यपरीक्षक म्हणून जातील. तर खासगी स्वयंअर्थसहाय्यिता शाळांमधील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी अनुदानित शाळांवरील शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे.

त्यानंतर लेखी परीक्षा सुरू झाल्यावर जिल्ह्यातील सगळे गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासह महसूल विभागातील तहसीलदार, प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकाऱ्यांची भरारी पथके सर्व केंद्रांना भेटी देणार आहेत. यावेळी ज्या केंद्रावर कॉपी केस आढळेल, त्या केंद्राची मान्यता कायमची रद्द केली जाणार आहे. एकूणच शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व केंद्रांवरील परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी संपूर्ण नियोजन जिल्हाधिकारी करणार आहेत.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी तगडे नियोजन

यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी केंद्रावरील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे बंधन घालण्यात आले आहे. परीक्षा केंद्र असलेल्या शाळांचे वॉल कंपाउंड पक्के असणार आहे. कॉपी पुरविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन लावले जातील. पर्यवेक्षकांच्या मोबाईलचे कॅमेरे झूमद्वारे जोडले जातील. प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेसाठी यावर्षी प्रथमच गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकाऱ्यांचीही पथके असतील. आता प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचे संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षांचे नियोजन होईल.

- औदुंबर उकिरडे, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे

सोलापूर जिल्ह्यातील केंद्रे

  • इयत्ता दहावी

  • १८८ केंद्रे

  • इयत्ता बारावी

  • १२० केंद्रे

  • ‘सीसीटीव्ही’ असलेली केंद्रे

  • ३०१

प्रात्यक्षिक परीक्षेसाठीही भरारी पथके

दरवर्षी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातात. त्यावेळी विद्यार्थ्यांकडून जमेल तसे प्रात्यक्षिक करून घेऊन त्यांना सरसकट गुण देण्याची प्रथा आहे. पण, आता प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, योजना विभागाचे शिक्षणाधिकारी व सर्व गटशिक्षणाधिकारी आणि विस्ताराधिकाऱ्यांची भरारी पथके प्रात्यक्षिक परीक्षेवेळी शाळांना भेटी देणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पारदर्शकपणे प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com