Recruitment : राज्यात महाभरती रखडली! ७५ हजार जागांच्या प्रक्रियेत अडथळा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मोठ्या आवेशात ७५ हजार जागांच्या महाभरतीची घोषणा करण्यात आली. मात्र, विविध टप्प्यांवर ही भरती प्रक्रिया रखडली.
Jobs
Jobssakal
Updated on

पुणे - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मोठ्या आवेशात ७५ हजार जागांच्या महाभरतीची घोषणा करण्यात आली. मात्र, विविध टप्प्यांवर ही भरती प्रक्रिया रखडली असून, उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यातच शासन सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवण्याच्या विचारात असल्याने उमेदवारांच्या असंतोषाला खतपाणी घातले आहे.

राज्यातील १५हून अधिक विभागांतील भरती प्रक्रियाच घोषित झालेली नाही. तर तलाठी आणि जिल्हा परिषदेची भरती परीक्षा होऊनही उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळालेले नाही. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे सांगतात, ‘राज्यातील एकही भरती प्रक्रिया सुनियोजित पद्धतीने झाली नाही.

शासनाने ७५ हजार जागांच्या भरतीची घोषणा केली. मात्र, अजूनही अनेक जागांची भरती रखडली आहे. राज्यात दोन लाखांहून अधिक जागा रिक्त असून, रखडलेल्या भरतीमुळे विद्यार्थी सत्ताधाऱ्यांवर संतप्त आहेत. शासनाने तातडीने निर्णय घेत विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.’’

अधिवेशनात यावर हवी चर्चा

  • सर्व नोकरभरती ‘एमपीएससी’द्वारे राज्यातील विविध सरळसेवा भरती प्रक्रिया वेगवेगळ्या कारणाने वादात सापडल्या आहेत. अनेक भरती प्रक्रियेत खासगी संस्थांनी गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. म्हणून पारदर्शक आणि विश्‍वासार्ह भरती प्रक्रियेसाठी सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करण्यात आली आहे. ज्याद्वारे सर्व पदांची भरती ‘एमपीएससी’च्या माध्यमातून होणार आहे. मात्र, त्याबद्दल कोणतीच कारवाई झालेली नाही.

  • परीक्षा प्रक्रिया नियोजित वेळेत पार पडण्यासाठी सुधारित धोरण तयार करण्यात यावे

  • विविध विभागांत नव्याने रिक्त झालेल्या ‘वर्ग १’ ते ‘वर्ग ३’ची दीड लाखांहून अधिक जागांची भरती घोषित करावी

  • राज्यसेवा २०२४ च्या जाहिरातीत एक हजार जागांची वाढ करावी

  • ‘एमपीएससी’द्वारे गट ‘ब’ आणि गट ‘क’ची मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित असलेली जाहिरात प्रसिद्ध करावी.

  • ‘एसईबीसी टू ओबीसी’ हा पर्याय राज्यसेवेच्या उमेदवारांसाठी खुला करावा

७५ हजार पदांची मेगाभरती विविध टप्प्यांवर अडकली असून, तिला गतीमानता देत १५ ऑगस्टपूर्वी नियुक्त्या देण्यात याव्यात. दुसरीकडे ‘एमपीएससी’च्या माध्यमातून परीक्षा घेण्याबाबतचा शासन नियम प्रसिद्ध आहे. मात्र अजूनही त्यात सुधारणा आवश्यक आहे.

- महेश बडे, स्टुडंट राईट्स असोसिएशन

रखडलेल्या भरतीचा गोषवारा

जाहिरात येणे बाकी

पदनाम - कनिष्ठ अभियंता

  • जलसंपदा विभाग

  • बृहन्मुंबई महानगरपालिका

  • पाणीपुरवठा विभाग

नियुक्ती रखडलेली

  • नगरपरिषद

  • ग्रामविकास विभाग

  • जलसंपदा विभाग

अर्ज भरले पण वेळापत्रक नाही

  • न्यायवैद्यक विभाग

  • आदिवासी विकास विभाग

  • महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

  • सिडको

नवीन जाहिराती यायला हव्यात

  • संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरात २०२४

  • सामाजिक न्याय विभाग

  • नगरपरिषद किंवा नगरपंचायत गट ‘क’ व गट ‘ड’

  • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

  • वित्त व लेखा कोषागार विभाग

  • नाशिक महानगरपालिका

  • बृहन्मुंबई महानगरपालिका

  • अहमदनगर महानगरपालिका

  • नागपूर महानगरपालिका

  • ठाणे महानगरपालिका

  • कल्याण -डोंबिवली महापालिका

  • चार कृषी विद्यापीठांच्या जाहिराती

  • महाबीज महामंडळ

  • महाराष्ट्र वखार महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com