
Anganwadi Workers : अंगणवाडी सेविकांना जुलैपासून मानधनवाढ - मंगलप्रभात लोढा
मुंबई : राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना राज्य सरकारने केलेली मानधनातील वाढ जुलैपासून मिळणार असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केल्याने हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात निर्णय होऊनही गेली दोन महिने मानधनात वाढ होत नसल्याने या कर्मचाऱ्यांनी निराशा व्यक्त केली होती.
राज्य सरकारने अंगणवाडी
सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात १ एप्रिल २०२३ पासून वाढ करण्याचा निर्णय घेतला. अंगणवाडी सेविकांना १० हजार, मिनी अंगणवाडी सेविकांना सात हजार २०० आणि अंगणवाडी मदतनिसांना पाच हजार ५०० रुपये मानधन देण्याची घोषणा केली. परंतु त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस वाढीव मानधन लवकर मिळावे यासाठी आग्रही होत्या.
राज्य शासनाने जरी १ एप्रिल २०२३ पासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी या वाढलेल्या खर्चाची तरतूद पुढील महिन्यात करणार आहोत. त्यामुळे जुलै महिन्यापासून वाढलेल्या मानधनाची अंमलबजावणी होईल.
- मंगलप्रभात लोढा, पर्यटन व महिला बाल विकास मंत्री