विरोधी पक्षांच्या उमेदवारांना मोठे मताधिक्‍य

congress-ncp
congress-ncp

मुंबई  -  राज्यात सर्वाधिक मताधिक्‍याने निवडणूक जिंकणाऱ्या उमेवारांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा पहिल्या तर काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम दुसऱ्या क्रमांकावर आहेत. राज्याचे मुख्यमंत्रिपद सलग पाच वर्षे सांभाळलेल्या देवेंद्र फडणवीस अत्यंत कमी फरकाने निवडून आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती मतदारसंघातील उमेदवार अजित पवार यांनी भाजपच्या गोपिचंद पडळकर यांचा तब्बल १ लाख ६५ हजार २६५ मताधिक्‍याने पराभव केला आहे. काँग्रेसचे पलूस-कडेगाव मतदारसंघातील उमेदवार विश्वजीत कदम यांनी शिवसेनेच्या संजय विभुते यांचा १ लाख ६२ हजार ५२१ मताधिक्‍याने पराभव केला आहे. काँग्रेसचे लातूर ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार धीरज देशमुख १ लाख १८ हजार २०८ मताधिक्‍याने निवडून आले आहेत. तसेच काँग्रेसचे भोकर मतदारसंघातील उमेदवार अशोक चव्हाण यांनी भाजपच्या सचिन गोरठेकरांचा तब्बल ९७ हजार ४४५ मताधिक्‍याने पराभव केला आहे.

हजार मतांच्या आत पाच उमेदवार पराभूत
मुंबई - विधानसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत हजार मतांच्या आतील मताधिक्‍याने पराभूत झालेल्या पाच उमेदवारांचा समावेश आहे. निवडणुकीचा निकाल काल लागला असून अत्यंत चुरशीच्या मतदारसंघांत धक्‍कादायक निकाल समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेसचे उमेदवार विश्‍वजित कदम एक लाखापेक्षा अधिक मतदाधिक्‍याने विजयी झाले आहेत, तर काही ठिकाणी अत्यंत कमी फरकाने उमेदवार पराभूत झाले आहेत. २८८ मतदारसंघांत अटीतटीचा सामना रंगला असतानाच पाच मतदारसंघांतील पराभूत झालेल्या उमेदवारांचा काळजाचा ठोका चुकला आहे. हे उमेदवार अत्यंत कमी फरकाने पराभूत झाले असून, त्यात भाजपच्या दोन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे. तब्बल अर्ध्या शतकाहूनही अधिक काळ विधानसभेत प्रतिनिधित्व केलेल्या शेकापच्या गणपतराव देशमुख यांचे नातू अवघ्या ७६८ मतांनी पराभूत झाले आहेत.

भाजप उमेदवारांचे  मताधिक्‍य
नागपूर - देवेंद्र फडणवीस 
४९ हजार ३४४
मुरबाड - किसन कथोरे
१ लाख ३५ हजार ४०

शिवसेना उमेदवार मताधिक्‍य
वरळी - आदित्य ठाकरे
६७ हजार ४२७
कोपरी - एकनाथ शिंदे  
८९ हजार ३००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com