
Nagpur News: विदर्भातील 37 हजार 834 वीज ग्राहकांची थकबाकीतून मुक्ती मिळाली आहे. कायमस्वरूपी कापलेल्या वीज कनेक्शनसाठी 31 मार्चपर्यंत संधी असून ग्राहकांना 'अभय योजना'चा लाभ घेता येणार आहे. या योजनेमुळे हजारो वीज ग्राहकांना लाभ मिळत आहे. विदर्भात नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला.